बाल्कनीत न्यूड स्टंट, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल; 12 महिलांना अटक

दुबईत पेंट हाऊसच्या बाल्कनीत महिलांच्या एका ग्रुपला न्यूड स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. (Women in Dubai had to stunt in balconies Stripped Naked, arrest)

बाल्कनीत न्यूड स्टंट, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल; 12 महिलांना अटक
nude stunt in dubai
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 11:01 AM

दुबई: जगात कुठे काय घडेल याचा काही नेम नाही. दुबईत पेंट हाऊसच्या बाल्कनीत महिलांच्या एका ग्रुपला न्यूड स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. न्यूड स्टंट करणाऱ्या या महिलांना अटक करण्यात आली आहे. (Women in Dubai had to stunt in balconies Stripped Naked, arrest)

दुबईतील मरीना शहरात पेंट हाऊसच्या बाल्कनीत 12 महिलांनी न्यूड स्टंट केला होता. न्यूड स्टंट करणाऱ्या या महिलांचा व्हिडीओ कुणी तरी काढला आणि तो सोशल मीडियावरून व्हायरल केला. त्यामुळे पोलिसांनी या सर्व महिलांना अटक केली आहे. या महिलांचं हे कृत्य अस्वीकार्य असून संयुक्त अरब अमिरातीच्या मूल्य आणि नैतिकतेच्या विरोधातील आहे, असं पोलिसांनी सांगितलं. अटक करण्यात आलेल्या महिलांना दुबईतील कायद्यानुसार सहा महिन्यांची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

व्हिडीओ शेअर करणाराही दोषी

एवढेच नव्हे तर न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यास त्यालाही शिक्षा करण्यात येते. यूएईच्या कायद्यानुसार अश्लील सामुग्री शेअर करणं हा दंडनीय गुन्हा आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व महिलांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलांची रवानगी तुरुंगात करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सार्वजनिकरित्या किस करणेही गुन्हा

अशा प्रकारचं अशोभनीय कृत्य न करण्याचा इशारा दुबई पोलिसांनी दिला आहे. दुबईतल सार्वजनिक ठिकाणिी किस करणं किंवा दारु पिणं सुद्धा गुन्हा आहे. दुबईत शरीया कायदा लागू आहे. त्यानुसार अश्लील व्यवहार करणं हा गुन्हा मानला जातो.

अंगरक्षकाशी संबंध प्रिन्सेसला भोवले

दरम्यान, यापूर्वी दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या पत्नीचे अंगरक्षकाशी संबंध होते, असा धक्कादायक आरोप केला जात आहे. प्रिन्सेस हया (Princess Haya) यांनी बॉडीगार्डला त्यांच्या नात्याबाबत गप्प राहण्यासाठी 12 लाख युरो म्हणजेच अंदाजे 12 कोटी रुपये दिल्याचा दावा केला जात आहे. ‘डेली मेल’ने ब्रिटिश कोर्टाच्या सुनावणीच्या आधारे हा दावा केला आहे. दुबईच्या राज्यकर्त्याने राजकुमारी हया यांना न कळवताच शरिया कायद्या अंतर्गत फेब्रुवारी 2019 मध्ये घटस्फोट दिला होता. 46 वर्षीय हया यांचे 37 वर्षीय ब्रिटीश वंशाचा अंगरक्षक रसेल फ्लॉवरसोबत असलेले अफेअर जवळपास 2 वर्षे टिकले. रसेलशी असलेले संबंध गुप्त ठेवण्यासाठी हया यांनी अन्य तीन अंगरक्षकांनाही कोट्यवधी रुपये दिल्याचा दावा केला जात आहे. अफेअर संपुष्टात आल्यानंतर राजकुमारी हया 2018 मध्ये दुबईहून पळून गेल्या आणि आता लंडनमध्ये राहत आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. डेली मेलच्या अहवालानुसार बॉडीगार्ड रसेल फ्लॉवरशी संपर्क साधला असता त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचबरोबर, राजकन्या हया यांनीही रसेलशी संबंधित काही दाव्यांचा इन्कार केल्याचे समजते. (Women in Dubai had to stunt in balconies Stripped Naked, arrest)

संबंधित बातम्या:

बॉडीगार्डसोबत रिलेशनशीप, दुबई शासकाच्या पत्नीकडून लपवाछपवीसाठी 12 कोटी?

विश्वास बसणार नाही, पण अलास्कातील ‘या’ शहरात आता थेट 2021 मध्ये सूर्योदय होणार

अवघ्या 3 दिवसात संपूर्ण जगाची भटकंती, महिलेचा विक्रम, कोण आहेत ख्वाला-अल-रोमेथी?

(Women in Dubai had to stunt in balconies Stripped Naked, arrest)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.