Video: ब्रेकिंग न्यूज सांगताना पत्रकार थांबला, लाईव्ह टीव्हीवर म्हणाला ‘पगार मिळत नाहीये, आम्हीही माणसंच’

एका वृत्तनिवेदकाने लाईव्ह बुलेटिनमध्येच थांबून आपल्या वेदना सांगितल्यात. आम्हीही माणसं आहोत, मात्र आम्हाला इथं काम करुनही पगार मिळत नाही, अशी तक्रार या पत्रकाराने सांगितलीय.

Video: ब्रेकिंग न्यूज सांगताना पत्रकार थांबला, लाईव्ह टीव्हीवर म्हणाला ‘पगार मिळत नाहीये, आम्हीही माणसंच'
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 5:13 PM

Zambia Journalist Viral Video on Salary लुसाका : कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांवरुन काढत आहेत, तर अनेकांना काम करुनही पगार मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांपर्यंत या बातम्या पोहचवणाऱ्या पत्रकारांचंच दुःख समोर आलंय. एका वृत्तनिवेदकाने लाईव्ह बुलेटिनमध्येच थांबून आपल्या वेदना सांगितल्यात. आम्हीही माणसं आहोत, मात्र आम्हाला इथं काम करुनही पगार मिळत नाही, अशी तक्रार या पत्रकाराने सांगितलीय. या पत्रकाराचं नाव कॅलिमिना काबिंदा (Kalimina Kabinda) असं असून तो झांबियाच्या केबीएन वृत्तवाहिनीत काम करतो. या घटनेनंतर जगभरात या व्हिडीओची चर्चा सुरू आहे (Zambia Journalist complaint about not getting salary on live news bulletin).

आफ्रिकेतील झांबिया (Zambia) देशातील केबीएन चॅनलमध्ये पत्रकारांकडून काम करुन घेतलं जातंय, मात्र पगार दिला जात नसल्याचा आरोप झालाय. हा आरोप दुसरा तिसरा कुणी नाही तर केबीएनच्या वृत्तनिवेदकाने लाईव्ह टीव्हीवर केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. कॅलिमिना काबिंदा या पत्रकाराने वृत्तवाहिनीवर बातम्या सांगत असतानाच मध्येच थांबून केबीएन चॅनलमध्ये काम करुनही माझ्यासह अनेक सहकाऱ्यांना पगार मिळत नसल्याचा आरोप त्यानं केला. हा प्रकार 19 जून रोजी घडला.

“काम करुनही पगार दिला जात नाही”

कॅलिमिना काबिंदा म्हणाले, ‘बातम्यांपलिकडे जाऊन आम्हीही माणसं आहोत. आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. दुर्दैवाने आम्हाला केबीएन टीव्हीकडून पगार दिला जात नाहीये. माझ्या सहकाऱ्यांना देखील वेतन दिलं जात नाहीये (Journalist Video on Salary).” इतकंच नाही तर काबिंदाने यानंतर हा व्हिडीओ आपल्या फेसबूक अकाऊंटवरही शेअर केलाय.

‘पत्रकार स्वतःवरील अन्यायावर बोलण्यास घाबरतात’

काबिंदा यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “हो मी लाईव्ह टीव्हीवर पगार मिळत नसल्याचं सांगितलं आहे. कारण अनेक पत्रकार यावर बोलण्यास घाबरतात. याचा अर्थ पत्रकारांनी यावर बोलायला नको असा नाही.” दुसरीकडे केबीएन (KBN TV Journalis) वृत्तवाहिनीचे सीईओ कॅनेडी मांब्वे यांनी चॅनलच्या फेसबुक पेजवर स्पष्टीकरण देत पत्रकार काबिंदा ब्रॉडकास्ट करत असताना नशेत असल्याचा आरोप केलाय. असं असलं तरी त्यांनी पत्रकारांना वेतन दिलंय जातंय की नाही यावर काहीही सांगितलं नाही.

पत्रकार नेमका काय म्हणाला, व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

… मग आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तुमच्या पगारावरही परिणाम होणार?

आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनाला यश, अखेर 1 जुलैपासून पगारात वाढ, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

कोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती

व्हिडीओ पाहा :

Zambia Journalist complaint about not getting salary on live news bulletin

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.