Bharat Ratna : भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला मिळतात या VIP सुविधा

Bharat ratna : भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार देशातील मोजक्याच लोकांना मिळाला आहे. ज्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो त्यांना अनेक व्हीआयपी सुविधा दिल्या जातात. भारतरत्न पुरस्काराची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात. जाणून घ्या भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना काय सुविधा मिळतात.

Bharat Ratna : भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला मिळतात या VIP सुविधा
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 9:00 PM

Bharat Ratna Award : कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ दिला जातो. प्रथम गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सीव्ही वेंकटरामन यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.

कोण करतं शिफारस?

भारतरत्नसाठी नावांची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात. यामध्ये राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व पदक दिले जाते. पुरस्कारासोबत पैसे दिले जात नाहीत. 1954 मध्ये हा सन्मान फक्त जिवंत व्यक्तींनाच दिला जात होता, मात्र 1955 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. हा सन्मान प्रजासत्ताक दिनी दिला जातो.

आतापर्यंत 48 जणांना भारतरत्न सन्मान मिळाला आहे. यंदा बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले कर्पूरी ठाकूर यांना ४९ वा भारतरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात आहे. कर्पूरी ठाकूर हे मागासलेल्या लोकांचा आवाज उठवण्यासाठी ओळखले जात होते.

भारतरत्न मिळणाऱ्या व्यक्तीला VIP दर्जा

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला देशात व्हीआयपीचा दर्जा मिळतो. प्रोटोकॉलनुसार, त्या व्यक्तीची गणना देशातील सर्वोच्च पदांवर असलेल्या लोकांसोबत केली जाते. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते यांच्यानंतर हे पद दिले जाते.

भारतरत्न मिळालेल्या लोकांना मिळतात या सुविधा

  • भारतरत्न प्राप्त करणार्‍या व्यक्तीला कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष व्हीआयपी दर्जा दिला जातो.
  • आयकर न भरल्यास सूट देखील उपलब्ध आहे.
  • भारतरत्न प्राप्त व्यक्ती संसदेच्या बैठका आणि अधिवेशनांना उपस्थित राहू शकतात.
  • देशाचे राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी होऊ शकतात.
  • भारतरत्न प्राप्तकर्ते विमान, ट्रेन आणि बसने मोफत प्रवास करू शकतात.
  • राज्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांना राज्य पाहुण्याचा दर्जा मिळतो.
  • या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तीला सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेंसीमध्ये स्थान देते, ज्याचा उपयोग सरकारी कार्यक्रमांमध्ये प्राधान्य देण्यासाठी केला जातो.
  • भारतरत्न मिळवणाऱ्या लोकांना राज्य सरकार सुविधा पुरवतात.

नावाला ‘भारतरत्न’ जोडता येत नाही

टनेच्या कलम 18 (1) नुसार, हा सन्मान प्राप्त करणारी व्यक्ती आपल्या नावाला उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून ‘भारतरत्न’ वापरू शकत नाही, परंतु व्हिजिटिंग कार्ड्स, बायोडेटा, पत्रांमध्ये भारतरत्न किंवा राष्ट्रपतींनी प्रदान केलेल्या भारतरत्नचा उल्लेख करू शकतो.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.