असे देश जिथे महिला 2 नवरे करू शकतात, बघा काय म्हणतो इथला कायदा

जगात असे देश आहेत जिथे महिलांना एकापेक्षा जास्त पती असू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची ओळख करून देणार आहोत, जिथे महिलांना दुसरे लग्न करण्यास कोणतेही बंधन नाही.

असे देश जिथे महिला 2 नवरे करू शकतात, बघा काय म्हणतो इथला कायदा
bihar news Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 6:20 PM

भारतात एकापेक्षा जास्त पती असणे बेकायदेशीर मानले जाते, परंतु काही देश असे आहेत जिथे पत्नी दोन पतींशी लग्न करू शकते. आजच्या काळात एकापेक्षा जास्त बायका असण्याबद्दल प्रत्येकाने ऐकलं असेल, पण जेव्हा महिलांचा प्रश्न येतो तेव्हा लोक आश्चर्यचकित होतात. पण जगात असे पाच देश आहेत जिथे महिलांना एकापेक्षा जास्त पती असू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची ओळख करून देणार आहोत, जिथे महिलांना दुसरे लग्न करण्यास कोणतेही बंधन नाही.

नेपाळ

एकापेक्षा जास्त पती करण्यास बंदी कायद्याने बंदी असली तरी नेपाळमध्ये हुमला, डोल्पा आणि कोसी सारख्या भागात असं करण्याची प्रथा अजूनही सुरू आहे. येथे स्त्रिया स्वतःच्या मर्जीने एकापेक्षा जास्त वेळा लग्न करू शकतात. यावर महिलांना कोणताही कायदा रोखू शकत नाही.

नायजेरिया

नायजेरियात जास्त लग्नासाठी परवानगी देणाऱ्या जमातीही आहेत. उत्तर नायजेरियातील इरिग्वे येथे अनेक विवाह खूप लोकप्रिय आहे. आजही स्त्रिया एकापेक्षा जास्त पतींशी लग्न करतात.

केनिया

केनियात मासाई जमाती मोठ्या संख्येने राहतात. अनेक लग्नांची, एकापेक्षा जास्त नवरे असण्याची प्रकरणे इथे मोठ्या प्रमाणात आढळतात. इथे स्त्रिया एकापेक्षा जास्त पतींशी लग्न करतात. हा ट्रेंड बराच जुना आहे.

चीन

चीनबद्दल बोलायचे झाले तर इथला ट्रेंड वेगळा आहे. चीनच्या तिबेट भागात एक महिला अनेक मुलांशी लग्न करू शकते. अशा गोष्टी तिथे सतत पाहायला मिळत असतात. पण कोणतं मूल कोणत्या नवऱ्याचं आहे हे स्त्रिया कोणालाही सांगत नाहीत. तसेच त्या आपल्या सर्व मुलांची चांगली काळजी घेतात.

भारत

नीलगिरीतील टोडा, त्रावणकोरमधील नायर, उत्तराखंडमधील जौनसार बावर, अरुणाचल प्रदेशातील गायलोंग, केरळमधील माला मलसर इत्यादी ठिकाणी ही प्रथा आजही जिवंत आहे. इथल्या महिलांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महिलांनी एकापेक्षा जास्त तरुणांशी लग्न केल्यास त्यांना रोखले जात नाही, तर त्यांचे लग्न पुन्हा मोठ्या थाटामाटात केले जाते.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.