AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा दिनपण असतो! याचं नेमकं कनेक्शन काय आहे?

National Youth Day : स्वामी विवेकानंद हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. धर्म, इतिहास ,कला, समज, विज्ञान, साहित्य सगळ्याच क्षेत्राची त्यांचा जाण होती. शिक्षणासोबतच शास्त्रीय संगिताबाबतही त्यांना माहिती होती. एक उत्तम खेळाडू म्हणूनही स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिलं जातं.

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा दिनपण असतो! याचं नेमकं कनेक्शन काय आहे?
स्वामी विवेकानंद
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 7:00 AM
Share

ते साल होतं, 1984. याच वर्षापासून संपूर्ण भारतात राष्ट्रीय युवा दिन हा स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांच्या जयंतीदिनी साजरा होऊ लागला. या दोन्हींचं एकमेकांशी फार खास कनेक्शन आहे. स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) एकाच दिवशी असणं, हा योगायोग नाही. ही ठरवून करण्यात आलेली गोष्ट आहे. त्यामागे एक पद्धतशीर कारणही आहे. हे कारण अनेकांना माहीत नाही. स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता 12 जानेवारी रोजी. तर राष्ट्रीय युवादिन ही 12 जानेवारी 1984 पासून सााजरा केला आहे. पण स्वामी विवेकानंद यांचा जन्म 1863 रोजी झाला होता. तर राष्ट्रीय युवा दिन हा स्वामीजींच्या जन्मानंतर तब्बल 121 वर्षांनी पहिल्यांदा राष्ट्रीय युवा दिन साजरा केला गेला.

काय आहे कनेक्शन?

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन युवकांसाठी एक विशेष आणि यादगार दिवस म्हणून पाहिला जावा, यासाठी 12 जानेवारील या दिवसाला महत्त्व देण्यात आलं. स्वामी विवेकानंद यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांचं योगदान हे भारतीय युवांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्त्रोत व्हाव, या उद्देशानं भारत सरकारनं 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जावा, अशी घोषणा केली.

ऑलराऊंडर व्यक्तिमत्त्व

स्वामी विवेकानंद हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. धर्म, इतिहास ,कला, समज, विज्ञान, साहित्य सगळ्याच क्षेत्राची त्यांचा जाण होती. शिक्षणासोबतच शास्त्रीय संगिताबाबतही त्यांना माहिती होती. एक उत्तम खेळाडू म्हणूनही स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्या अलौकिक विचारांमधून त्यांनी असंख्य तरुणांना दिशा दिली. प्रेरणा दिली. प्रोत्साहित केलं.

खरं नाव नरेंद्र होतं?

स्वामी विवेकानंद यांनी 1897 साली कोलकामध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 1898 साली गंगा नदीच्या किनाऱ्यावरील बेलूरमध्ये रामकृष्ण मठाचीही स्थापना केली होती. वयाच्या 25व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी संसाराचा त्याग केला आणि ते संन्यासी झाले. संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव विवेकानंद पडलं. स्वामी विवेकानंद यांचं नाव नरेंद्रनाथ दत्त होतं.

संबंधित बातम्या –

Ratan Tata | पुण्याचा शांतनु रतन टाटांचा इतका खास कसा काय झाला? त्याची गोष्ट

Know This | Health | ज्येष्ठंना तरुणांपेक्षा जास्त थंडी वाजते! असं का होतं?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.