Ayushman Card: पाच लाखांचा मोफत विमा हवा? घरी बसूनच असे बनवा आयुष्मान वय वंदना कार्ड?

Ayushman Bharat Vay Vandana Card for senior citizens above 70 years: आयुष्मान वय वंदना कार्ड 70 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला मिळेल. त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. गरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंत प्रत्येक गटातील व्यक्तीला हे कार्ड मिळणार आहे. या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहे.

Ayushman Card: पाच लाखांचा मोफत विमा हवा? घरी बसूनच असे बनवा आयुष्मान वय वंदना कार्ड?
Ayushman Bharat Vay Vandana Card
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 10:20 AM

Ayushman Bharat Vay Vandana Card: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनतेरसच्या दिवशी देशाला नवीन योजना दिली. आधी असलेल्या ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा (AB PM-JAY) विस्तार करण्यात आला. नवीन योजनेत देशातील 70 वर्षांवरील कोणत्याही गटातील व्यक्तीला पाच लाखांचा मोफत विमा मिळणार आहे. तो व्यक्ती कोणत्याही उत्पन्न गटातील असला तरी त्याला या योजनेचा लाभ होणार आहे. खासगी रुग्णालयात या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी लागणारे आयुष्मान वय वंदना कार्ड काय आहे? हे कार्ड कसे मिळवू शकतात…

कार्ड मिळवण्यासाठी फक्त ही एकच अट

आयुष्मान वय वंदना कार्ड 70 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला मिळेल. त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. गरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंत प्रत्येक गटातील व्यक्तीला हे कार्ड मिळणार आहे. या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहे. आधार कार्डनुसार 70 वर्ष वय पूर्ण झालेल्या व्यक्तींना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

आधार कार्डद्वारे करा ई केवाईसी

आयुष्मान वय वंदना कार्ड मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यासाठी आधार बेस्ड ई-केवाईसी करावी लागणार आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) योजनेसाठी आधार कार्ड हे एकमात्र डाक्युमेंट लागणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती वेबसाइट beneficiary.nha.gov.in किंवा आयुष्मान अ‍ॅपवर दिली आहे. त्या माध्यमातूनच यासाठी नोंदणी केल्यावर कार्ड मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

या ठिकाणी बनवता येईल कार्ड

नॅशनल हेल्थ अथॉरिटीच्या वेबसाइट beneficiary.nha.gov.in वर किंवा आयुष्मान ऐप https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp&hl=en_IN&pli=1 किंवा जवळच्या लिस्टेड हॉस्पिटलमधून कार्ड मिळवता येणार आहे. तसेच CSC केंद्रावर जाऊन कार्ड बनवता येणार आहे. अधिक माहितीसाठी 14555 या क्रमांकावर कॉल करावा. आयुष्मान भारत वय वंदना कार्डची नोंदणी करणे सोपे आहे. त्यासाठी काही स्टेप पूर्ण केल्यावर कार्ड मिळणार आहे.

अशी करा प्रक्रिया

  • लाभार्थी म्हणून तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर आयुष्मान ॲप डाउनलोड करावे लागेल.
  • कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर मोबाइल नंबर टाकून ओटीपी आल्यावर तो टाका.
  • लाभार्थी तपशील भरा, आधारचा तपशील भरा.
  • त्यानंतर जर लाभार्थी मिळाला नाही तर ई-केवायसी प्रक्रियेचे अनुकरण करा.
  • घोषणा फॉर्म भरा, फोटो काढा आणि अतिरिक्त तपशील भरा.
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.