सोशल मीडियावर Reels हिरोंचा डंका, मनोरंजनासोबत पैसे कमावण्याचा काय आहे फंडा? जाणून घ्या!

How to earn form Instagram Facebook You Tube : सोशल मीडिया मनोरंजनाच्या साधनासोबतच अर्थाजनाचं माध्यम बनत आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पैसे कमवू इच्छित असल्यास तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी.

सोशल मीडियावर Reels हिरोंचा डंका, मनोरंजनासोबत पैसे कमावण्याचा काय आहे फंडा? जाणून घ्या!
कसे कमवायचे सोशल मीडियातून पैसे?
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 8:11 PM

मुंबई : सोशल मीडियाच्या दमदार प्रभावामुळं ‘रील’ हिरोंचा सर्वत्र डंका आहे. एका रात्रीत ‘स्टार’ बनविण्याची किमया सोशल मीडियात आहे. आज कानाकोपऱ्यातला ‘रील हिरो’ आपल्या युनिक कंटेटनं जगाला डोक्यावर घेतोय. मात्र, रात्रीत स्टार ठरणाऱ्यांची हवा गुल करण्यातही सोशल मीडिया पटाईत आहे. सोशल मीडिया मनोरंजनाच्या साधनासोबतच अर्थाजनाचं माध्यम बनत आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पैसे कमवू इच्छित असल्यास तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी. तुम्हाला घरबसल्या पैसे कमाईची संधी जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि यूट्यूब (You tube) वर मिळेल. दरम्यान, फेसबुक इंकनेआपल्या प्लॅटफॉर्म वरुन कंटेंट क्रिएटर्सला जाहिरातीच्या माध्यमातून शॉर्ट फॉर्म व्हिडिओतून कमाईची संधी देणार असल्याचं म्हटलं आहे.

तुम्ही कंटेट क्रिएटर्स असाल तर केवळ जाहिरातीच्या माध्यमातूनच नव्हे तर अन्य प्रकारेही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमाईची अनेक कवाड खुली आहेत.

1 मिनिटाच्या व्हिडिओतून किती कमाई?

फेसबुक सह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कंटेट क्रिएटर्ससाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या आहेत. फेसबुक सूत्रांच्या माहितीनुसार, फेसबुकवर यूजर्स एक मिनट पर्यंतचा व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकेल. सर्व गोष्टींसाठी महत्वाची अट म्हणजे व्हिडिओमध्ये कमीतकमी 30 सेकंदाची जाहिरात दिसायला हवी. तीन मिनिटांहून अधिक वेळेच्या व्हिडिओत अंदाजित 45 सेकंदाची जाहिरात दिसायला हवी. फेसबुकच्या धोरणामुळे क्रिएटर्सला अधिकाधिक पैसे मिळणे शक्य ठरते आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार पैसे कमाईचा प्रवास सुरू करण्यासाठी यूजर्स किंवा पेजला मागील 60 दिवसांच्या दरम्यान त्यांच्या व्हिडिओला एकूण 6 लाख व्हूयजची आवश्यकता असेल. लाईव्ह व्हिडिओच्या नवीन जाहिरात धोरणानुसार व्हिडिओ 60,000 मिनिटे पाहणे आवश्यक ठरते.

इन्स्टाग्रामवर कमाईचा मार्ग?

सध्या इन्स्टाग्राम (Instagram) नवीन ब्रँडच्या रुपात समोर येत आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मोठे सेलिब्रेटी इंस्टाग्राम वर ब्रँड असोसिएशनच्या मार्फत पैशाची कमाई करत आहे. ब्रँड सर्व सेलिब्रेटी किंवा यूजर्ससह कॅशमध्ये डील करतात आणि त्यांचे प्लॅटफॉर्म डीलनुसार कमिशनची कपात करतात. केवळ ब्रँड असोसिएशनच नव्हे तर कंटेट क्रिएटर्स स्वतंत्र अ‍ॅप निर्मिती करुन टॅलेंटचे प्रदर्शन करून पैसे कमवू शकतात.

संबंधित बातम्या :

‘या’ चार बँकांनी केलेत त्यांच्या नियमावलीत बदल, खातेधारकांनी जाणून घेणे महत्त्वाचे…

ओवरड्रॉफ्ट सुविधेद्वारे होम लोनचे ओझे कमी करा, जाणून घ्या फायदे

तेलाचे दर घसरले, अंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याचा परिणाम, ग्राहकांना दिलासा

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.