आजच्या दिवशी इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना देण्यात आली होती फाशी, दोन अंगरक्षकांनी का चालवल्या 25 गोळ्या?

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खलिस्तान वाद्यांविरोधात 'ऑपरेशन ब्लू स्टार' चालविले होते. ऑपरेशनमुळे नाराज झालेल्या त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करत त्यांची हत्या घडवून आणली होती.

आजच्या दिवशी इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना देण्यात आली होती फाशी, दोन अंगरक्षकांनी का चालवल्या 25 गोळ्या?
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 1:01 PM

पोलादी महिला पंतप्रधान म्हणून ओळख असलेल्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची हत्या घडवून आणणाऱ्या सतवंत सिंह आणि केहर सिंह यांना आजच्या दिवशी फाशी देण्यात आली होती. सतवंत सिंह आणि बेअंत सिंह इंदिरा गांधी यांचे सुरक्षारक्षक होते 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांनी इंदिरा गांधी यांची निवास्थानी 25 गोळ्या झाडून हत्या केली होती या हत्येच्या कटात केहर सिंह सुद्धा सहभागी होता अन्य सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात बेअंत सिंह ठार झाला होता. तत्कालीन पंजाब मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार ची सुरुवात केली होती या ऑपरेशनमुळे सतवंत सिंह बेअंत सिंह केहर सिंह नाराज झाले होते  केहर सिंह  याने इंदिरा गांधी यांच्यावर गोळीबार केला नव्हता मात्र तो या षड्यंत्राचा एक भाग होता बेअंत सिंहला अन्य सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीच ठार केले होते तर केहर सिंह हा कटामध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झाले होते

अंगरक्षकांनीच झाडल्या होत्या गोळ्या

31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी सकाळी नऊ वाजता पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर पडल्या त्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होत्या त्याच वेळेस अचानक जवळच  असलेल्या बेअंत सिंह याने इंदिरा गांधी यांच्यावर त्याच्या कडील सर्विस रिवाल्वर मधून तीन गोळ्या झाडल्या आणि तो के सतवंत सिंह वर ओरडला बघतोस काय गोळ्या झाड सतवंत सिंह यानेही त्याच्याकडील बंदुकीतून इंदिरा गांधी यांच्या दिशेने फैरी झाडल्या. इंदिरा गांधी यांना त्वरित एम्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले चार तासानंतर दुपारी दोन वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

गोळीबारानंतर सतवंत सिंह आणि बेअंत सिंह पळून जात असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पळून जाताना बेअंत सिंह हा गोळीबारात ठार झाला.सतवंत सिंह याला ताब्यात घेण्यात आले शीख धर्मियांसाठी पवित्र स्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात खलिस्तान वाद्यांनी  घुसखोरी केली होती त्यांच्या विरोधात ऑपरेशन ब्लू स्टार राबविण्यात आले होते त्या नाराजीने या तीनही अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांना मारण्याचे षड्यंत्र रचले होते.

पाच वर्षानंतर फाशी

सतवंत सिंह आणि केहर सिंह तसेच बलवंत सिंह यांच्याविरोधात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणात खटला दाखल करण्यात आला बलवंत सिंह याच्या विरोधात कुठलाही पुरावा न सापडल्याने त्याची मुक्तता करण्यात आली तर या हत्याकांडाच्या पाच वर्षानंतर सतवंत सिंह आणि केहर सिंह यांना 6 जानेवारी 1989 रोजी तीहार तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आले त्यांचे मृतदेह कुटुंबियांना देण्यात आले नाही त्यांच्यावर तुरुंग प्रशासनाने अंत्यसंस्कार केले

इतर बातम्या-

Cotton Rate : उत्पादन घटल्यानेच कापसाला विक्रमी दर, हंगामात अतिवृष्टीचा अडसर कायम राहिला

मोलनूपिराविर औषध कोविड-19 व्हायरसवर प्रभावी? कोरोना विषाणूवर कशा प्रकारे मिळवते नियंत्रण? समजून घेऊया

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.