पहिल्यांदा कमांडो म्हणून सैन्यात काम नंतर सॉफ्टवेअर कंपनीचे मालक, इस्त्राईलचे पंतप्रधान नफाताली बेनेट नेमके कोण?

इस्राईलमध्ये नुकताच सत्ता बदल झाला आहे. गेली 15 वर्षे सत्तेत असलेले बेंजामिन नेतान्याहू पंतप्रधान पदावरुन पायऊतार झाले आहेत. इस्त्राईलची सत्ता लिकुड पक्षाच्या नफताली बेनेट यांच्या ताब्यात आहे.

पहिल्यांदा कमांडो म्हणून सैन्यात काम नंतर सॉफ्टवेअर कंपनीचे मालक, इस्त्राईलचे पंतप्रधान नफाताली बेनेट नेमके कोण?
नफताली बेनेट
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 11:03 PM

नवी दिल्ली: इस्राईलमध्ये नुकताच सत्ता बदल झाला आहे. गेली 15 वर्षे सत्तेत असलेले बेंजामिन नेतान्याहू पंतप्रधान पदावरुन पायऊतार झाले आहेत. इस्त्राईलची सत्ता लिकुड पक्षाच्या नफताली बेनेट यांच्या ताब्यात आहे. 49 वर्षीय बेनेट पुढील दोन वर्षांसाठी देशाचा कार्यभार स्वीकारतील. त्यानंतर तो यायर लॅपिड यांच्याकडे देतील. बेनेट हे तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आणि उजव्या विचारसरणीचे राजकारणी आहेत. पॅलेस्टाईनच्या मुद्यावर नेतान्याहूंच्या कट्टर विचारांचं ते समर्थन करतात. बेनेट यांचा जन्म इस्राईलच्या ऐतिहासिक शहर हायफामध्ये झाला. त्यांची आई सध्या अमेरिकेत असून वडिलांनी इस्रायली सैन्यात नोकरी केली आहे. बेनेट यांच बालपण अमेरिकेत गेल्यानं ते अमेरिकन धाटणीचं इंग्रजी बोलतात. नवीन पीएम बेनेट तेल अवीवच्या उपनगराच्या रानानामध्ये राहतात. त्यांच्यासोबत त्यांची बायको आणि चार मुलंही इस्रायलमध्ये राहत आहेत. (Israel Prime Minister Naftali Bennett know about his political journey )

राजकारणापर्वी सैन्यदलात काम

राजकारणात येण्यापूर्वी बेनेट सैन्यदलातील सेवेदरम्यान देशातील एलिट कमांडो फोर्सचा एक भाग होता. कमांडो फोर्समध्ये सेवा करणे इस्त्रायली नागरिकांसाठी अनिवार्य आहे. 1996 मध्ये, दक्षिण लेबनॉनमध्ये तैनात असताना बेनेट आणि त्याच्या युनिटने लेबनीज गाव कफ्र कानावर हल्ला केल होता. त्यावेळी इस्त्रायली सैन्याने लेबनॉन ताब्यात घेतला. इस्राईलने केलेल्या हल्ल्यात 102 लेबनी नागरिक मारले गेले होते. तर उर्वरित नागरिकांना संयुक्त राष्ट्रांच्या छावणीत आश्रय घ्यावा लागला. ती घटना अजूनही काना हत्याकांड म्हणून ओळखली जात आहे.

सैन्यदल सोडल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात नशीब आजमावलं

सैन्यदल सोडल्यानंतर बेनेट तंत्रत्रान क्षेत्रात उतरले. बेनेट यांनी यावेळी जेरूसलेममधील हिब्रू विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला. 1999 पर्यंत त्यांनी स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली होती. ती एक सॉफ्टवेअर कंपनी होती. बेनेट यांनी पुढे ही कंपनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये हलवली. 2005 साली त्यांनी आपली कंपनी विकली. बेनेटची कंपनी एंटी फ्रॉड सॉफ्टवेअर बनवत होती, अमेरिकेच्या एका सुरक्षा कंपनीने 145 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केली होती.

नेत्यानाहू बेनेट यांचे गुरु

2005 मध्ये कंपनी विकल्यानंतर बेनेट यांनी इस्त्राईच्या राजकारणात प्रवेश केला. 2006 मध्ये ते नेत्यान्याहू यांच्यासोबत वरिष्ठ सहाय्यक म्हणून काम करु लागले. बेनेट 2008 पर्यंत नेत्यानाहू यांच्याबरोबर राहिले. मात्र, या काळात बेनेट आणि नेतान्याहू यांचे संबंध चांगले नव्हते. नेतान्याहू बेनेटचे राजकीय गुरू होते, पण दोघांमधील वयामधील अंतरामुळं वाद होतं असतं. नेत्यानाहू यांचं सरकार सोडल्यानंतर बेनेट यांनी येशा काऊन्सिलचे अध्यक्षपद भूषवले. इस्रायली चळवळ पुढे नेण्यासाठी ही परिषद काम करते. इस्राईलने 1967 मध्ये वेस्ट बँकवर कब्जा केला होता. पॅलेस्टाईनसुद्धा या भागावर आपला हक्क सांगत आहे.

बेनेट 2013 ज्यूइश होम पार्टीचे प्रमुख म्हणून इस्त्रायली राजकारणात काम करत होते. बेनेट यांनी यांनी नेतान्याहूंच्या सरकारमध्ये देशाचे संरक्षण, शिक्षण आणि अर्थमंत्री म्हणूनही काम केले आहे. वर्ष 2018 मध्ये, बेनेटने अयलात शैक्ड यांच्याशी हातमिळवणी केली. आयलत शैक्ड हे इस्त्रायली राजकारणातील आक्रमक नेते आहेत. दोघांनी एकत्र येत न्यू राईट पार्टी सुरू केली. 2019 मध्ये या पक्षाने निवडणूक लढविली नाही. परंतु, यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत न्यू राईट पक्षाचा भाग असलेल्या यामिना पक्षाने 120 पैकी 6 जागा जिंकल्या आणि बेनेट यांनी संसदेत प्रवेश केला. बेनेट इराणबाबतची इस्त्राईलच्या धोरणांना पुढे नेतील. बेनेट देखील टेम्पल माऊंटला ताब्यात घेण्याची भाषा बोलतात. टेम्पल माऊंट हे जेरूसलेमचा एक भाग आहे. जो मुस्लिमांसाठी खूप पवित्र आहे.

संबंधित बातम्या:

Knowledge | चित्राप्रमाणे सुंदर दिसणारं, पाण्यावर वसलेलं शहर ‘व्हेनिस’, जाणून घ्या का आणि कसं वसवलं?

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा ? लस प्रभावी आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात?

Israel Prime Minister Naftali Bennett know about his political journey

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.