आंतर्देशीय विमान प्रवासात दारुची ऑफर नाही, मग आंतरराष्ट्रीय उड्डाणात मद्यपान कसे चालते? जाणून घ्या कारण
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की जेव्हा आपण इंटरनेशनल फ्लाइट्समध्ये प्रवास करतो तेव्हा पॅसेंजरला दारूची ऑफर केली जाते परंतु हीच गोष्ट डोमेस्टिक फ्लाइट्समध्ये केली जात नाही. आज आपण यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जर तुम्ही इंटरनॅशनल फ्लाइटने (International Flight) ट्रॅव्हल केले असेल तर अनेकदा तुम्ही पाहिले असेल की या फ्लाईटमध्ये लोकांना दारू ऑफर केली जाते. जर तुम्ही या फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल केले नसेल तरी अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल. परंतु जेव्हा आपण डोमेस्टिक फ्लाईटमध्ये (Domestic Flight) ट्रॅव्हल करतो तेव्हा अशा वेळी फ्लाइटमध्ये मद्य कधीच सर्व्ह केले जात नाही,अशावेळी तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की असे का बरं, यामागे नेमके कारण काय आहे? नेमके असे काय कारण आहे की ज्यामुळे डोमेस्टिक फ्लाईट्स मध्ये दारूचे वाटप किंवा ऑफर केली जात नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यामागील महत्त्वाचे कारण सांगणार आहोत ,चला तर मग जाणून घेऊया.
नियम काय सांगतात?
आपणास सांगू इच्छितो की, सिविल एविएशन मिनिस्ट्रीने डोमेस्टिक फ्लाइटमध्ये दारू सेवन करण्यास तसेच दारूचे वाटप करण्यावर बंदी घातली आहे आणि आता फक्त इंटरनेशन फ्लाइट मध्येच दारूची ऑफर दिली जाते. जर या मागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर असे विशेष काही कारण नसून फक्त जास्तीत जास्त नियम महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि या कारणामुळेच अनेकदा बंदी घालण्यात आली आहे.
दीर्घकालीन प्रवासामुळे मद्याची ऑफर
परंतु जर या नियमांबाबत बोलायचे झाल्यास, या नियमांमध्ये वेगवेगळे तर्क सांगितले जातात. असे म्हटले जाते की, इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये दारू ऑफर करण्याचे कारण त्याचे ड्यूरेशन म्हणजे ट्रॅव्हलींग टाईम असू शकतो आणि जास्त टायमिंग पिरियडच्या कारणामुळे फ्लाईटमध्ये रिफ्रेशमेंट म्हणून दारू ची ऑफर केली जाते.
आरामदायी प्रवास
तसेच एक तर्क असा सुद्धा सांगितला जातो की, कमी मात्रा मध्ये अल्कोहोलचे सेवन केल्याने लोकांना झोप सुद्धा चांगली येते आणि यामुळे त्यांची इंटरनॅशनल फ्लाईट मधील जर्नी सुद्धा आरामात आणि सहजरित्या पार पाडते म्हणूनच फक्त तुमच्या कम्फर्ट साठी दारूची ऑफर केली जाते.
आता डोमेस्टिक फ्लाईटमध्ये दारू न देण्याचे तर्क सुद्धा सांगण्यात आलेले आहे ते तर्क म्हणजे फ्लाईट खूपच जास्त लांब नसेल आणि कमी डिसस्टनस् ची असेल तर अशावेळी दारूचे वाटप केले जात नाही कारण की एक नियम असा सुद्धा आहे की दारूची ट्रॉली फक्त हवेतच ओपन केली जाऊ शकते म्हणून जर हि ट्रॉली हवेत ओपन केली तर ती कमी काळ टिकून राहते अशातच दारूचे वाटप करणे शक्य होत नाही.
संबंधित बातम्या :
दरवर्षी डासांमुळे लाखांवर मृत्यू, तरीही शास्त्रज्ञ डासांना वाचवतात! जर डासच नसतील तर काय होईल?
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या माध्यामातून स्मार्ट मास्कची निर्मिती, मानवी गरजेनुसार करणार काम