कॉमेडियन ते राष्‍ट्रपती : रशियापुढं नतमस्तक न होणाऱ्या वोलोदिमीर जेलेंस्की यांचा प्रेरणादायी प्रवास!

Life of Volodymyr Zelensky: यहूदी धर्मात जन्माला आलेले वोलोदिमीर जेलेंस्की यांचा जन्‍म 25 जानेवरी, 1978 ला यूक्रेन मध्ये झाला. यांचे वडील ऑलेक्‍जेंडर जेलेंस्की प्रोफेसर आणि आई रायमा जेलेंस्का पेशाने इंजीनियर होत्या. चला तर मग जाणून घेऊया वोलोदिमीर यांचा प्रेरणा देणारा प्रवासाबद्दल...

कॉमेडियन ते राष्‍ट्रपती : रशियापुढं नतमस्तक न होणाऱ्या वोलोदिमीर जेलेंस्की यांचा प्रेरणादायी प्रवास!
Volodymyr Zelenskyy
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 9:22 PM

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये भीषण युद्ध चालू आहे. या युद्धाची झळ दोन्ही देशाला बसत आहे. हल्ला झाल्यानंतर 24 तास उलटून गेले आहेत. असे असून सुद्धा यूक्रेनचे(व्लोदिमीर राष्‍ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) हे रशिया (Russia) समोर नतमस्तक झाले नाहीये.या घटनेबद्दल जेलेंस्की यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगीतले की, शत्रूंनी मला सर्वात पहिला टारगेट बनवला आहे. यानंतर माझ्या कुटुंबीयांना टारगेट केले जाईल. जेलेंस्की यांचे म्हणणे आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ परंतु ते हार मानायला आम्ही तयार नाहीत. जेलेंस्की ट्वीट च्या माध्यमातून आपले प्रत्येक महणणे देशातील जनता आणि जगापर्यंत पोहोचवत आहेत.जेलेंस्की कसे यूक्रेनचे राष्‍ट्रपती बनले?, त्यांचे व्यक्तिगत जीवन कसे आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत ? या सगळ्याबद्दल सविस्तरपणे चला तर मग जाणून घेऊया या …

रशिया समोर नतमस्तक न होणारे वोलोदिमीर

  1. लॉ मध्ये ग्रेजुएशन केले पूर्ण :यहूदी धर्मात जन्माला आलेले वोलोदिमीर जेलेंस्की यांचा जन्‍म 25 जानेवरी, 1978 ला यूक्रेन मध्ये झाला. यांचे वडील ऑलेक्‍जेंडर जेलेंस्की प्रोफेसर आणि आई रायमा जेलेंस्का पेशाने इंजीनियर होत्या. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइल मध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली परंतु वडिलांची परवानगी न मिळाल्या कारणामुळे वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 2000 मध्ये कीव नेशनल इकोनॉमिक यूनिवर्सिटीद्वारे लॉची डिग्री प्राप्त करून आपले ग्रेजुएशन पूर्ण केले.
  2. कॉमेडी चे शौकीन:  एक काळ असा होता की, वोलोदिमीर आपल्या कॉमेडी शैलीसाठी प्रसिद्ध होते.याची सुरुवात शिक्षण घेत असताना झाली. ही कला त्यांच्या अंगी आधी होती.याची जाणीव त्यांना शिक्षण घेताना झाली. 1997 मध्ये वोलोदिमीर यांनी काही अभिनेत्यासोबत एकत्र येऊन ‘क्वार्टल 95’ नावाचा एक कॉमेडी ग्रुप बनवला. लोकांनी वोलोदिमीर यांच्या कामाला खूप पसंती दिली. ज्याचा परिणाम इतका झाला की , 2003 मध्ये त्यांनी आपले कार्यक्रम सुरू केले. स्वतः च्याच एका कार्यक्रमातून प्रेरीत होऊन भविष्यात राजकारण क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचे त्यांनी ठरवले. अशाप्रकारे त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला.
  3. 73 % मतं मिळवून बनले राष्‍ट्रपती : 2018 मध्ये वोलोदिमीर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. वोलोदिमीर यांनी ‘सर्वेंट ऑफ द पीपल पार्टी’ बनवली.या पक्षातून त्यांनी राष्‍ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली. निवडणुकीत 73 % वोट मिळवून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि देशाचे राष्ट्रपती पद भूषविले.
  4. स्‍क्रीन राइटर ओलेना सोबत 2003 मध्ये केला विवाह वोलोदिमीरयांचा विवाह 2003 मध्ये ओलेना वोलोदिमीर जेलेंस्का (Olena Volodymyrivna Zelenska) यांच्याशी झाला. ओलेना पेशाने एक आर्किटेक्‍ट आणि स्‍क्रीन राइटर आहे परंतु लोकांची मदत करणे आणि सामाजिक कार्यात विशेष आवड असल्याने त्यांची समाजसेविका म्हणून देखील ओळख आहे. कोरोना महामारी दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या अनेक कार्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक सुद्धा केले गेले. ओलेना कीव नेशनल यूनिवर्सिटी च्या विद्यार्थिनी होत्या आणि येथून त्यांनी सिविल इंजीनियरिंग मध्ये ग्रेजुएशन पूर्ण केले.
  5. दोन मुलांचे वडील वोलोदिमीर यूक्रेन चे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की आणि त्यांची पत्‍नी ओलेना यांना दोन मुले आहेत.एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचे नाव किरिलो आणि मुलीचे नाव ऑलेक्‍जेंड्रा आहे. वोलोदिमीर आणि त्यांची पत्‍नी ओलेना इंस्‍टाग्राम वर नेहमी आपल्या कुटुंबीयांचे फोटो शेअर करत असतात. सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीत मध्ये त्यांना भीती आहे की आपल्याला टार्गेट केल्यानंतर भविष्यात आपल्या कुटुंबियांना टार्गेट केले जाईल याबद्दल असे सूचक विधान त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये केले आहे.

इतर बातम्या: 

BANK HOLIDAY: मार्च महिन्यात ‘या’ तारखांना बँका बंद, वेळेपूर्वीच पूर्ण करा कामं

Uddhav Thackeray Live | महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु : उद्धव ठाकरे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.