महाराष्ट्रातील उदारमतवादी समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

माणसाच्या बुध्दीस मुक्त करणं आणि त्यास आधुनिक, निष्कलंक आणि परिपूर्ण करणं हाच सामाजिक सुधारणेचा उद्देश आहे. आपल्या बुध्दीस (पर्यायाने विचारास) उर्ध्वगामी करत जाऊन त्याला सतत ‌‌‌क्रियाशील ठेवणे, हे जर आम्ही करू शकलो नाही, तर मग आपल्याकडून आपल्या पूर्वजांप्रमाणे काहीतरी भव्यदिव्य होण्याची अपेक्षा सोडून द्यावी लागेल.

महाराष्ट्रातील उदारमतवादी समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
Mahadev govind Ranade
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 10:36 AM

महाराष्ट्रातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थतज्ज्ञ म्हणून ओळख मिळवलेले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आज जन्म दिवस (18 जानेवारी 1842) रोजी नाशिकमधील निफाड गावी त्यांचा जन्म झाला. मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले तसेच माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईत झाले.

माणसाच्या बुध्दीस मुक्त करणं आणि त्यास आधुनिक, निष्कलंक आणि परिपूर्ण करणं हाच सामाजिक सुधारणेचा उद्देश आहे. आपल्या  विचारास उर्ध्वगामी करत जाऊन त्याला सतत ‌‌‌क्रियाशील ठेवणे, हे जर आम्ही करू शकलो नाही, तर मग आपल्याकडून आपल्या पूर्वजांप्रमाणे काहीतरी भव्यदिव्य होण्याची अपेक्षा सोडून द्यावी लागेल.  असे न्या. रानडे म्हणत असत.

वाचनाच्या छंदाने घडवले आयुष्य

महादेव गोविंद रानडे यांना वचनाची विलाक्षण आवड होती. शिक्षण घेत असतानाच त्यांनी भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला होता. त्यांना वाचनाची आवड होती त्यामुळे त्यांनी शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्‍त इतर विषयांचेही अनेक ग्रंथ अभ्यासले. वर्ष 1862 मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. वर्ष 1864 मधे एम.ए.ची परीक्षा दिली व वर्ष 1865 मध्ये कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाच्या फेलोंमध्ये त्यांचा समावेश झाला. वर्ष 1866 च्या जूनमध्ये त्यांची सरकारच्या ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी नेमणूक झाली. मराठी भाषेत जे ग्रंथ त्या वेळी प्रसिद्ध होत होते, त्यांच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करीत. साहित्य, इतिहास, समाजशास्त्र विषय यासंबंधी त्यांच्या अभिप्रायांत विस्तृत विवेचन केलेले आढळते. वर्ष 1868 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली. त्यानंतर वर्ष 1871 मधे पुण्यास न्यायखात्यात दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. हे पद न्यायाधीशाचे समान होते.

सार्वजनिक सभेची सूत्रे घेतली हाती

भारतातील प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया प्रथम त्यांनी घातला. पुढे सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक यांनी मोठी कामगिरी केली. स्वदेशीचा प्रचार व संघटनेचे कार्य रानडे व जोशी यांनी सुरू केले. भारताच्या आर्थिक ऱ्हासाची आणि विकासाची शास्त्रशुद्ध मीमांसा केली होती. न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर 1893 साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. त्या काळात भारतीयांना उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद मिळणे अभिमानाची गोष्ट होती. त्यावेळी पुण्यातील जनतेने हा प्रसंग उत्सवासारखा साजरा केला. न्यायदानाच्या कामात त्यांनी नि:स्पृहपणा, कायदेशास्त्राचे सखोल ज्ञान व न्यायनिष्ठा हे त्यांचे गुण दाखवून दिले.

(गुगलवरून साभार )

Investment Schemes : मुलांचे लग्न ते शिक्षणाचा खर्च, दीर्घकालीन गुंतवणुकीचा ‘अर्थ’मार्ग, मॅच्युरिटीवेळी बंपर रिटर्न!

RIP ND Patil | ‘आबाsss न्याय मिळायला पाहिजे’ असं एनडी पाटील आरआर पाटलांवर का ओरडले होते?

Satara : शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दुर्दैवी घटना

गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या कारचा कट अन् पाळदी गावात 2 गटात राडा
गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या कारचा कट अन् पाळदी गावात 2 गटात राडा.
लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?
लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?.
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?.
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.