Milk | सकाळ की रात्र, दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या…

आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की, दूध (Milk) पिणे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि आजारी व्यक्तीपासून ते निरोगी व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, तुम्ही हे पाहिलेच असेल की, बरेच लोक सकाळी दूध पितात आणि बर्‍याच लोकांना रात्री दूध प्यायला आवडते.

Milk | सकाळ की रात्र, दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या...
दूध
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 10:21 AM

मुंबई : आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की, दूध (Milk) पिणे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि आजारी व्यक्तीपासून ते निरोगी व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, तुम्ही हे पाहिलेच असेल की, बरेच लोक सकाळी दूध पितात आणि बर्‍याच लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. त्याच वेळी, यामध्ये देखील दुमत असते की, कोणत्या वेळी दूध पिणे योग्य आहे? याबद्दल बोलताना बरेच लोक म्हणतात की, सकाळी दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, तर बरेच लोक रात्री दूध सेवन करणे अधिक योग्य मानतात (Morning or Night know which time is best to drink milk).

अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. दूध पिण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे? आपण कोणत्या वेळी दूध प्यावे? आणि आपल्या शरीरासाठी दूध कसे फायदेशीर आहे?, हे देखील जाणून घेऊया…

दुधाचे फायदे काय?

दूध हे जरी एक पेय असले, तरी दुधाला संपूर्ण अन्न मानले जाते. दूध हा भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो दुधाच्या रूपातच सेवन केला जातो आणि त्यातून बरेच प्रकारची उत्पादनेही तयार केली जातात. केवळ कॅल्शियमच नाही तर दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे ए, बी 1, बी 2, बी 12 आणि डी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक घटक असतात. या कारणास्तव, ते एक संपूर्ण अन्न मानले जाते. पाचन आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी दुधाचे आयुर्वेदात विशेष स्थान आहे.

दूध पिण्याची योग्य वेळ?

आयुर्वेदानुसार, दूध पिण्याची योग्य वेळ म्हणजे रात्री. असे म्हणतात की, रात्री झोपण्यापूर्वी एखाद ग्लास दूध प्यावे. तसेच, असेही म्हटले जाते की दुधामुळे कोणतीही अॅलर्जी होत नसून, इतर सर्व लोकांनी दूध प्यावे. तसेच, जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध प्याल, तर तुम्हाला चांगली झोप देखील मिळेल. पाचन आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी दुधाचे आयुर्वेदात विशेष स्थान आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही रात्री दूध पीता, तेव्हा तुम्हाला कॅल्शियमचे अधिक फायदे मिळतात. कारण, रात्रीच्या वेळी तुमची क्रिया पातळी कमी असते.

त्याचबरोबर, सकाळच्या वेळात दूध पिणे देखील बर्‍याच प्रकारे फायदेशीर आहे, कारण ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या असते, त्यांना रात्री दूध पचवणे अवघड होते. यासह घरात जर 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असतील, तर दिवसा दूध पिणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु, रात्री दूध पिणे अधिक योग्य मानले जाते.

(Morning or Night know which time is best to drink milk)

हेही वाचा :

Knowledge | चित्राप्रमाणे सुंदर दिसणारं, पाण्यावर वसलेलं शहर ‘व्हेनिस’, जाणून घ्या का आणि कसं वसवलं?

आधार कार्ड वेरिफाय कसं करायचं? क्यूआर कोड वेरिफिकेशन म्हणजे काय? वाचा सविस्तर

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.