Russia Ukraine War: मार्शल लॉ म्हणजे काय?, जो यूक्रेनने रशियाच्या हल्ल्यानंतर लगेचच लागू केलाय

Russia Ukraine War: रशिया आणि यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले आहे युक्रेनने आता आपल्या देशामध्ये मार्शल लॉ लागू केला आहे, अशातच मार्शल लॉ लागू केल्यानंतर नागरिकांच्या अधिकाऱ्यांमध्ये नेमके काय बदल होतात हे जाणून घेऊया...

Russia Ukraine War: मार्शल लॉ म्हणजे काय?, जो यूक्रेनने रशियाच्या हल्ल्यानंतर लगेचच लागू केलाय
रशिया यूक्रेन युद्ध
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 9:24 PM

गेल्या अनेक दिवसापासून रशिया आणि युक्रेन (Russia And Ukraine War) यांच्यात वाद चालू होता व या वादाचा परिणाम आता युद्धामध्ये झालेला पाहायला मिळत आहे. हल्ली दोन्ही देशांत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन सोबत युद्ध करण्याची घोषणा देखील केली आहे आणि सांगितले की, रशिया युक्रेन मध्ये लवकरच हल्ला करणार आहे.रॉयटर्स ने युक्रेनच्या एकंदरीत परिस्थिती बद्दल सांगितले की, रशिया हल्ल्यामध्ये (Russia Attack) कमीत कमी 7 लोक मारले गेले आणि 9 जण जखमी झाले आहेत तसेच रशियाच्या या हल्ल्यामुळे NATO जोरदार कारवाईच्या तयारी मध्ये लागलेला आहे म्हणूनच NATO च्या वतीने 30 सदस्य देशांकडून लवकरच रशियावर हल्ला केला जाईल. NATO रशियाविरुद्ध आर्टिकल 4 चा वापर करेल.या वादामुळे प्रत्येकाचे असे म्हणणे आहे की ही जागतिक युद्धाची सुरुवात आहे परंतु युक्रेन ने दावा केला आहे की, रशियाने केलेल्या या हल्ल्यात 300 लोक मारले गेले सोबतच असा दावा देखील केला जात आहे की, त्यांचे अनेक लष्कराचे ठिकाण उद्ध्वस्त करून टाकले आहे. युक्रेनने रशियाकडून हल्ला सुरु झाल्यानंतर युक्रेन चे राष्ट्रपती यांनी देशामध्ये मार्शल लॉ ची घोषणा केली आहे त्याचबरोबर नागरिकांना घाबरू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

अशातच अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नेमका मार्शल लॉ म्हणजे काय आणि हा कायदा लागू केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये काय बदल होतो.

मार्शल लॉ म्हणजे काय?

मार्शल लॉ म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, या काळामध्ये लष्कराचे राज्य असते. संपूर्ण समाजावर लष्कर नियंत्रण करत असते, यालाच मार्शल लॉ असे म्हणतात. मार्शल लॉ लागू केल्यानंतर लष्कराद्वारे जे काही नियम सांगितले जातात, त्या सर्व नियमांचे पालन नागरिकांना करावे लागतात. हा कायदा लष्कराद्वारे लोकांसाठी देण्यात आलेला आहे आणि या कायद्याचे पालन नागरिकांना करणे अनिवार्य असते. सध्या युक्रेनमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. अनेक देश वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये हा कायदा लागू करतात.

मार्शल लॉ कधी लागू करतात?

तसे पाहायला गेले तर मार्शल लॉ हा कायदा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकट काळामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी ,तेथील परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी लागू केला जातो त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये थेट मिलिटरी कंट्रोल असते. हल्ली युक्रेनमध्ये सगळी कडे मिलिटरीचे कंट्रोल पाहायला मिळते आहे.

जेव्हा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा देशांमध्ये मार्शल लॉ लागू केला जातो. या काळात धर्मांत नागरिकांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे मूळ अधिकार रद्द केले जातात तसेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य कोणतेही शोधकार्य या साऱ्या गोष्टींवर बंदी घातली जाते. बैठका,आंदोलन, राजकीय पक्ष यांच्यावर प्रतिबंध लावण्यात येतात. हा कायदा लागू केल्यानंतर बहुतांश भागांमध्ये कर्फ्यू लावला जातो. सिविल लॉ , सिविल अधिकार संपुष्टात येतात.जे लोक या कायद्याचे पालन करत नाही त्या लोकांच्या विरोधात योग्य ती कारवाई देखील या काळात दरम्यान केली जाते.

इतर बातम्या:

Russia Ukraine Crisis | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्धात मध्यस्थी करावी, यूक्रेनची विनंती

रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत 160 अब्ज पौंड संपत्तीचे मालक; अलिशान कारची संख्या ऐकून थक्क व्हाल

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.