विमानात सगळ्यात सुरक्षित सीट कोणतं? अभ्यास काय सांगतो? वाचा
पण या दरम्यान एक अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की विमानाची कोणती सीट सर्वात सुरक्षित सीट मानली जाते.
दरवर्षी जगभरातून एक मोठा विमान अपघात समोर येतो. काही काळापूर्वी नेपाळमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विमानाने प्रवास करणे सुरक्षित नाही का, अशी चर्चा सुरू होती. पण या दरम्यान एक अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की विमानाची कोणती सीट सर्वात सुरक्षित सीट मानली जाते.
खरं तर या अभ्यासाला अमेरिकन दिग्गज टाइम मॅगझिनने अंतिम रूप दिलं आहे. टाइम सर्व्हेमध्ये विमान अपघातांची 35 वर्षांची आकडेवारी तपासण्यात आली. ज्यात अनेक तथ्ये समोर आली आहेत. ‘टाइम’ने आपल्या अहवालात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. अहवालानुसार, विमानाच्या मागच्या भागातील मधल्या सीटचा मृत्यूदर सर्वात कमी होता. विमानाच्या मागील बाजूस असलेल्या मधल्या सीटचा मृत्यूदर 28 टक्के होता.
याचा अर्थ असा की फ्लाइटच्या मागील आणि मधील भागाच्या दरम्यानचा मध्यवर्ती बिंदू सर्वात सुरक्षित आहे. मधल्या सीटचा मागचा भाग आणि मागच्या सीटचा पुढचा भाग सुरक्षित मानला गेलाय. थोडक्यात काय तर त्या दरम्यानची जागा सुरक्षित आहे. 1985 ते 2022 या कालावधीत झालेल्या अपघातांचा विचार केल्यास सर्वात वाईट बसण्याची जागा विमानाच्या मधोमध आहे. मधल्या सीटचा मृत्यूदर 39 टक्के होता, तर पुढच्या सीटचा मृत्यूदर 38 टक्के आणि मागच्या सीटचा 32 टक्के होता.