महाराष्ट्रात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाने सातवा बळी घेतला आहे (Seventh Corona patient death in Marashtra). कोरोनामुळे मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 1:53 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने सातवा बळी घेतला आहे (Seventh Corona patient death in Marashtra). कोरोनामुळे मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मुंबईच्या एका महापालिका रुग्णालयात या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान, महिलेचा काल (28 मार्च) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर आज रिपोर्टमध्ये त्यांना कोरोना असल्याचं निष्पन्न झालं (Seventh Corona patient death in Marashtra).

कोरोनाबाधित महिलेला याआधी कोणताही आजार नव्हता. मात्र, त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यांच्या छातीत आणि पाठित दुखू लागलं. त्यामुळे काल दुपारी त्यांना मुंबई महापालिकेच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुपारी तीन वाजता या महिलेला व्हेंटिलेटर लावण्यात आलं. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला.

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण  देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संपूर्ण नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 193 वर

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचं थैमान सुरुच आहे. लॉकडाऊननंतरही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 193 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आज मुंबईत 4, जळगावमध्ये 1, सांगली 1, नागपूर 1 असे रुग्ण सापडले. यामुळे आरोग्य यंत्रणांच्या काळजीत वाढ झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आता राज्य सरकारने खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यास सुरुवात केली आहे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 77 पुणे – 24 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर –  12 कल्याण – 7 ठाणे – 5 नवी मुंबई – 6 यवतमाळ – 4  (यवतमाळ  येथील 3 रुग्ण चाचणी  निगेटीव्ह ) अहमदनगर – 3 सातारा – 2 कोल्हापूर – 1 गोंदिया – 1 पनवेल – 2 उल्हासनगर – 1 वसई विरार – 4 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 पुणे ग्रामीण-  1 पालघर- 1 जळगाव- 1 इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 193

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च बुलढाणा – 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू – 28 मार्च

 
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 77 12 4
सांगली 25
पुणे 24 6
पिंपरी चिंचवड 12 8
नागपूर 12 1
कल्याण 7
नवी मुंबई 6 1
ठाणे 5
यवतमाळ 4
अहमदनगर 3 1
सातारा 2
पनवेल 2
कोल्हापूर 1
गोंदिया 1
उल्हासनगर 1
वसई-विरार 4
औरंगाबाद 1 1
सिंधुदुर्ग 1
पालघर 1
जळगाव 1
रत्नागिरी 1
पुणे ग्रामीण 1
गुजरात 1
बुलडाणा 0
एकूण 193 19 5

संबंधित बातम्या :

Corona : मध्य प्रदेशात BSF जवानाला कोरोनाची लागण, 50 जवानांना क्वारंटाईन

भारतात कोरोनाचं थैमान, पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून नागरिकांशी संवाद साधणार

Corona LIVE: नागपूरकरांना दिलासा, कोरोनाचे आणखी दोन रुग्ण बरे

कर्मचाऱ्यांच्या मनात कोरोनाची भीती, पाठीवर पंप घेवून नगराध्यक्ष स्वत:च निर्जंतूक फवारणीच्या कामाला

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.