खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे (Amravati MP Navneet kaur Rana tested Corona Positive).

खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Aug 06, 2020 | 2:59 PM

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे (Amravati MP Navneet kaur Rana tested Corona Positive). त्यांच्या घरातील आतापर्यंत 11 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांचा आणि सासू-सासऱ्यांचा समावेश आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे नवनीत राणांनंतर रवी राणा यांचादेखील रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Amravati MP Navneet kaur Rana tested Corona Positive).

आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.

आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं. रवी राणा यांच्या आई-वडिलांवर नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिथे नवनीत राणा आणि रवी राणादेखील गेले होते. सासू-सासरे आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट प्रतीक्षेत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे” असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी एप्रिल महिन्यात दौरे केले होते. नवनीत कौर राणाही यामध्ये सहभागी होत्या. त्यावेळी (एप्रिल महिन्यात) रवी राणा यांना 103-104 या श्रेणीत ताप आला. त्यामुळे त्यांच्या शरीरभर असह्य वेदना जाणवू लागल्या होत्या. तेव्हा त्यांना खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती.

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनीही शिवसेना उमेदवाराचाच पराभव केला. शिवसेनेच्या संजय बंड यांच्या पत्नी प्रिती यांना रवी राणांनी पराभवाची धूळ चारली होती.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.