National Sports day: औरंगाबादच्या मातीतला क्रिकेटर अमेरिकन संघात, सुशांतच्या क्रिकेट भरारीची खास कहाणी

2022 मध्ये होणाऱ्या भारतातील वर्ल्डकपमध्ये अमेरिकन संघाकडून तो खेळणार आहे. सुशांतच्या आधी औरंगाबादचे इक्बाल सिद्दीकी, संजय बांगर यांनीही भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

National Sports day: औरंगाबादच्या मातीतला क्रिकेटर अमेरिकन संघात, सुशांतच्या क्रिकेट भरारीची खास कहाणी
अमेरिकन संघाकडून खेळणारा औरंगाबादचा क्रिकेटपटू सुशांत मोदाणी
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 1:36 AM

औरंगाबाद: कितीही अडथळे आले तरी स्वप्नं पाहणं आणि त्याच्या पाठीशी धावणं थांबवू नका, असा संदेश देणारा सुशांत मोदाणी हा औरंगाबादच्या मातीत घडलेला गुणी क्रिकेटपटू. सुशांत जयचंद्र मोदाणी (Sushant Modani)  सध्या आयसीसीच्या (ICC) आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अमेरिकन संघाकडून खेळत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात त्याची ऑलराऊंडर म्हणून निवड झाली आहे. सुशांत मागील पाच वर्षांपासून अमेरिकेत (America) नोकरीनिमित्त वास्तव्यास असून यापुढेही तो अमेरिकेतील क्रिकेट संघाकडून खेळच राहील. (Aurangabad cricket player Sushant Modani playing for American Cricket team)

भारताकडून न खेळता अमेरिकन संघात कसा?

एखाद्या खेळाडूकडे बघताना तो आपल्या देशाकडून खेळताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. पण आपल्या देशाचा खेळाडू इतर देशाकडून खेळताना, थोडं चुकल्यासारखं वाटतं, याविषयी विचारलं असता, सुशांत म्हणतो, कला आणि खेळाला सीमांचे बंधन नसते. मी भारताकडूनही खेळण्यासाठी प्रयत्न केले. 13,16, 19 आणि खुल्या गटात औरंगाबादचे प्रतिनिधीत्व केले. 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघाकडूनही एक सत्र खेळलो, मात्र ऐन रणजी सामन्यात परफॉर्मन्स डाऊन झाल्याने पुढे संधी मिळाली नाही. पण पुढे अमेरिकेत नोकरीसाठी गेल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या टीममध्ये चमक दाखवू शकलो.

टीव्ही सेंटर परिसरात सुशांतचं घर..

अमेरिकन संघात स्थान मिळण्यापर्यंतचा प्रवास उलगडताना सुशांत म्हणाला, टीव्ही सेंटर परिसरात आमचं घर आहे. वडील दूरदर्शन कार्यालयात टेक्निशियन म्हणून काम करतात. आठवीत असताना क्रिकेट क्लास लावला. त्यानंतर दिनेश कुंटे आणि विनोद माने यांचे प्रशिक्षण लाभले. खेळ सुधारण्यासाठी अखंड मेहनत करत राहिलो. शिक्षण सुरु असताना काही अडथळे येत राहिले, पण मी जिद्द सोडली नाही.

बारावीनंतर एका मार्काने MBBS हुकलं..

क्रिकेटच्या मैदानावर चमकणारा सुशांत अभ्यासातही मागे नाही. 12 वी नंतर त्याने डॉक्टर व्हावे, असे वडिलांचे स्वप्न होते. त्यासाठी सुशांतने बारावीत क्रिकेट थांबवून पूर्ण अभ्यासात लक्ष दिले. पण एका मार्काने एमबीबीएसला नंबर लागला नाही आणि त्याने जेएनईसी कॉलेजला इंजिनिअरिगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तो पुण्यात टेक महिंद्रा कंपनीत नोकरीला लागला.

क्रिकेट की करिअर प्रश्न उभा राहिला

पुण्यात 2012 मध्ये नोकरीला लागल्यानंतर मात्र सुशांतला क्रिकेट आणि करिअर या दोघांनाही न्याय देणं कठीण होऊ लागलं. पण दैव बलवत्तर झालं अन् कंपनीने त्याला अमेरिकेच्या शाखेत काम करण्यासाठी आमंत्रण दिलं. अमेरिकेतल्या कामाच्या वेळा ठराविक मुदतीतच असल्यामुळे ऑफिसचं काम करूनही सुशांतला पुन्हा एकदा क्रिकेटला चांगला वेळ देता येऊ लागला. तिथे त्याने बिस्टा लॉरेन्स प्रीमियर लीगमध्ये शतकी केळी केली. इतरही तीन लीग खेळल्या. दोन वर्षांपूर्वी त्याला आयसीसीने अमेरिकन संघात खेळण्याची परवानगी दिली.  2022 मध्ये होणाऱ्या भारतातील वर्ल्डकपमध्ये अमेरिकन संघाकडून तो खेळणार आहे. सुशांतच्या आधी औरंगाबादचे इक्बाल सिद्दीकी, संजय बांगर यांनीही भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

संकटातही खंबीर उभ्या असलेल्या आईकडून प्रेरणा

आपल्या इथवरच्या यशाचे श्रेय सुशांत त्याच्या आईला देतो. गेल्या 20 वर्षांपासून त्यांना आर्थरायटीसचा आजार आहे. पण आजारापुढे न झुकता त्या तिन्ही मुलांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. सुशांत कुटुंबातला सर्वात मोठा मुलगा. त्याच्या पाठचे दोघेही भाऊ क्रिकेट आणि इतर खेळात उत्तम कामगिरी करत आहेत. (Aurangabad cricket player Sushant Modani  playing for American Cricket team, special interview)

इतर बातम्याः 

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

Yuzvendra Chahal : क्रिकेट विश्वातल्या ‘या’ क्युट कपलची मालदीव सफर.. 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.