धक्कादायक! पोहायला गेलेल्या दोन बहिणींचा तलावात बुडून मृत्यू
दोन चुलत बहिणी या पोहोण्यासाठी गेल्या होत्या, पण त्यानंतर थेट त्यांच्या मृत्यू बातमी आल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दोन चुलत बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन चुलत बहिणी या पोहोण्यासाठी गेल्या होत्या, पण त्यानंतर त्यांच्या मृत्यू बातमी आल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या दोघीही तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Aurangabad news Two sisters drowned while swimming)
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील खामगावात ही घटना घडली आहे. ऋतुजा कवडे आणि आरती कवडे अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत. खरंतर, कोरोनाच्या संकटात गेले अनेक महिने कोणीही घराबाहेर पडलं नाही. त्यामुळे गावात तरुण-तरुणांची अशी मज्जा सुरूच असते. पण दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या बहिणींना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यात तलाव तुंडूब भरलं होतं. त्यामुळे खोलीकरनामुळे त्यांना पोहता आलं नाही आणि अशात बुडून दोघींचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचेही मृतदेह बाहेर काढले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि आरतीचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, घरातल्या हसत्या-खेळत्या मुलींचा असा अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
इतर बातम्या –
आजच करा जनधन खात्याशी Aadhaar लिंक, मिळतील 5000 रुपये
Gold Price: 3 दिवसांनी पुन्हा स्वस्त झालं सोनं, पाहा काय आहेत आजचे दर
(Aurangabad news Two sisters drowned while swimming)