8 डिसेंबर रोजी भारत बंद! जाणून घ्या; मुंबईसह राज्यात काय सुरू असेल आणि काय बंद?

केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. (bharat bandh : fruits and vegetables will not be available on 8 December in maharashtra)

8 डिसेंबर रोजी भारत बंद! जाणून घ्या; मुंबईसह राज्यात काय सुरू असेल आणि काय बंद?
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 9:00 PM

मुंबई: केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. बळीराजाच्या या बंदला देशभरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. यावेळी कांदा, मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. माथाडी कामगारही काम बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. तर शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा म्हणून कोकणात रिक्षा आणि टॅक्सीही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या राज्यातील जनतेला फळ, भाज्या मिळणार नाहीत. उद्या मुंबईसह महाराष्ट्रात कुठे कुठे आणि काय काय बंद ठेवण्यात येणार आहे, याचा घेतलेला हा आढावा. (bharat bandh : fruits and vegetables will not be available on 8 December in maharashtra)

माथाडी कामगार बंदमध्ये सहभागी होणार

केंद्र सरकारच्या कृषी व पणन कायद्या विरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार व व्यापाऱ्यांनी उद्या होणाऱ्या संपात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजार समितीच्या संचालकांची आज नवी मुंबईत बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामे कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतकऱ्यांवर बेकारीचे संकट ओढविले आहे. केंद्र सरकारच्या कामगार, व्यापारी व शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱे तमाम माथाडी कामगार आणि व्यापारी मंगळवार ( 8 डिसेंबर) रोजी संपावर जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र पाटील ,आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप व व्यापारी असोसिएशनने पदाधिकारी व बाजारसमीतिचे संचालक यांनी सांगितले.

मुंबई, पुणे, नाशिकची बाजारपेठ बंद राहणार

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य, मसाला, फळ, भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट उद्या बंद राहणार आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक, पुणे बाजारपेठ बंद राहणार आहे.

मनमाड बाजार समिती बंद, लिलाव बंद

उद्या बंदच्या पार्श्वभूमीवर मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत. यावेळी बाजार समितीत होणारे कांदा मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव होणार नाही. उद्याच्या बंदमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सीटूही सहभागी होणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती उद्या बंद राहणार असून कोणत्याही शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, असं आवाहन बाजार समिती अध्यक्ष देविदास पिंगळे यांनी केलं.

दूध, फळ-भाज्यांचा तुटवडा जाणवणार

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह प्रमुख बाजारपेठाही बंद राहणार आहेत. त्यामुळे राज्यात उद्या भाजीपाला आणि फळांची आवक होणार नाही. परिणामी जनतेला उद्या भाजीपाला-फळं मिळणं मुश्किल होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या दूधाचाही पुरवठा होणार नसल्याचं समजतं. त्यामुळे उद्या राज्यातील जनतेला कोरा चहा प्यावा लागणार आहे.

एसटीची वाहतूक बंद

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या ग्रामीण भागात एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

लासलगावात कांदा लिलाव नाही

बंदमुळे उद्या लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा लिलाव बंद राहणार आहे. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे फिरकू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

चाकण बाजार समिती बंद

बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या पुण्यातील चाकण बाजार समिती बंद राहणार आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, ओतूर आणि आळेफाटा येथील मार्केटही बंद राहणार आहेत.

सोलापुरातही अडते व्यापाऱ्यांचा बंद

सोलापुरातही उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असून अडते, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार उद्या कडकडीत बंद पुकारणार आहेत.

वसईत व्यापारी बंदमध्ये सहभागी होणार

उद्या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बंदला हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. उद्या वसई-विरारमध्ये भाजप वगळता बविआ, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेससह इतर संघटना बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं बविआचे संघटक सचिव आजीव पाटील यांनी सांगितलं. बविआने या बंदमध्ये व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं असून व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

कोकण विभागात रिक्षा, टॅक्सी बंद

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केल्याने या देशातील शेतकरी संपूर्णपणे नष्ट होऊन शेती व्यवसाय हा बड्या मक्तेदार, भांडवलदारांच्या ताब्यात जाण्याची भीती आहे. त्यामुळे देशातला शेतकरी वाचला पाहिजे, त्याला संरक्षण मिळाले पाहिजे म्हणून कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने शेतकरी आदोलंन व भारत बंदला जाहीर पाठिबां दिला आहे. त्यामुळे उद्या मंगळवार ८ डिसेबंर रोजी कोकण विभागातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवण्यात येणार असल्याचं कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितलं.

जागर आंदोलन ते अंत्ययात्रा

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून वाशिममध्ये वातावरण निर्मिती सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात विविध पक्ष आणि संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहेत. संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 वाजता धरणे आंदोलन केलं. कारंजा येथे प्रहार संघटनेने कालपासूनच जागर आंदोलन सुरू केलं असून काँग्रेसने आज दुपारी एक वाजता काळ्या कायद्याच्या विरोधात अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला. (bharat bandh : fruits and vegetables will not be available on 8 December in maharashtra)

कोल्हापुरात बाजारपेठा बंद

कोल्हापुरातील सर्व व्यापारी उद्या आंदोलनात भाग घेणार असल्याने उद्या कोल्हापुरातील बाजारपेठा बंद राहणार आहेत. आज राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. उद्या व्यापारी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होतील. बिंदू चौकात भाजपवगळता सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते आणि व्यापारी ठिय्या आंदोलन करतील. त्यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

काय काय बंद असणार?

  • राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या,
  • कांदा, मका, बटाटासह इतर शेत मालाचा लिलाव
  • राज्यातील बाजार पेठा
  • दूध, फळे, भाजीपाल्यांचा पुरवठा होणार नाही
  • कोकणात रिक्षा टॅक्सी बंद
  • मुंबईत दुकानं, खासगी संस्था, खासगी कार्यालये बंद राहतील
  • बाजार समितीच्या सर्व ट्रान्सपोर्ट सेवा बंद राहणार

काय बंद नसेल

  • अत्यावश्यक सेवा
  • मुंबईतील बेस्ट
  • मुंबईत टॅक्सी-रिक्षा
  • मुंबईत दूध, भाजीपाला पुरवठा, लग्न समारंभ सुरू राहणार
  • नवी मुंबईत दूध,औषधची दुकाने सुरू राहणार
  • नवी मुंबईत NMMT बस सेवा सुरू राहणार
  • नवी मुंबईत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
  • कल्याण-डोंबिवलीत परिवहन सेवा सुरू राहणार

या पक्षांचं समर्थन

उद्या होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय लोकशाही पार्टीने पाठिंबा दिला आहे. (bharat bandh : fruits and vegetables will not be available on 8 December in maharashtra)

या पक्षांचा पाठिंबा नाही

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला असतानाच भाजप, रयत क्रांती संघटना आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी मात्र पाठिंबा दिलेला नाही.

या कायद्यांना विरोध

  • मूल्य उत्पादन आणि कृषी सेवा अधिनियम, २०२०
  • आवश्यक वस्तू (संशोधन) अधिनियम, २०२०
  • शेतकऱ्यांचं उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) अधिनियम, २०२०

या आहेत मागण्या

  • केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करा
  • कृषी कायद्यातील इंटर-स्टेट इंट्रा-स्टेट व्यवसायाला विरोध
  • इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगद्वारे शेतमाल विक्रीला परवानगी देण्यास विरोध
  • या कायद्यामुळे कृषा बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. शेतकऱ्यांना एमएसपी मिळणार नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं.
  • वन नेशन वन मार्केट नव्हे तर, वन नेशन वन एमएसपी असावी अशी शेतकऱ्यांची मागणी
  • कृषी कायद्यात शेतीशी संबंधित सर्व जोखीम शेतकऱ्यांवर टाकण्यात आली आहे. त्यालाही शेतकऱ्यांचा विरोध आहे.
  • या कायद्याद्वारे प्रायव्हेट कार्पोरेट हाऊसेसकडून शोषण होण्याची शेतकऱ्यांची भीती. (bharat bandh : fruits and vegetables will not be available on 8 December in maharashtra)

संबंधित बातम्या:

FARMER PROTEST | कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ? केंद्रीय कायदा मंत्र्यांचा हल्लाबोल

क्रीडापटूंची शेतकऱ्यांना साथ, राष्ट्रपती भवनात पुरस्कार वापसीसाठी जाणाऱ्या खेळाडूंची पोलिसांकडून अडवणूक

गुजरातमध्ये ‘भारत बंद’ होणार नाही, जबरदस्तीने बंद पुकारल्यास कारवाई; मुख्यमंत्री रुपाणी यांचा इशारा

(bharat bandh : fruits and vegetables will not be available on 8 December in maharashtra)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.