पुरुषांच्या, पुरुषांसाठी, पुरुषांद्वारे बातम्या, महिलांच्या दृष्टीकोनाला बातम्यांमध्ये अद्यापही स्थान नाही, मीडियाचं भयानक वास्तव

मीडियाकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये स्त्रियांना सर्रासपणे गृहित धरलं जातं, असं समोर आलं (bill and melinda gates foundation report says women perspective is missing in news).

पुरुषांच्या, पुरुषांसाठी, पुरुषांद्वारे बातम्या, महिलांच्या दृष्टीकोनाला बातम्यांमध्ये अद्यापही स्थान नाही, मीडियाचं भयानक वास्तव
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 5:10 PM

मुंबई : स्त्री सक्षमीकरणावर भरपूर चर्चा होते. स्त्री शिक्षणासाठी जगभरात वेगवेगळे उपक्रम राबावले जातात. स्त्री-पुरुष समानतासाठी देखील अनेक उपक्रम राबवले जातात. मात्र, जगाला विविध घडामोडींची माहिती देणारी मीडिया स्त्रीयांची बाजू मांडताना कमी पडत असल्याचं संमोर आलं आहे. मीडियाकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये स्त्रियांना सर्रासपणे गृहित धरलं जातं, असं समोर आलं. स्त्रियांना देखील मत आहे, त्यांची काहितरी भूमिका आहे, याचा अद्यापही विचार केला जात नाही. यामागे मीडियामध्ये पुरुषांची संख्या जास्त असल्याने स्त्रियांचा फारसा विचार केला जास नसल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे (bill and melinda gates foundation report says women perspective is missing in news).

सप्टेंबर महिन्यात इंटरनॅशनल वूमन मीडिया फाऊंडेशनचा एक रिपोर्ट समोर आला होता. या रिपोर्टमध्ये अमेरिका आणि यूकेसह जगभरातील सहा देशांमध्ये छापल्या आणि वाचल्या जाणाऱ्या बातम्यांचं विश्लेषण करण्यात आलं होतं. महिलांना गृहित धरुनच बातम्या छापल्या जातात. आजही बातम्या पुरुषांच्या दृष्टीकोनाने छापल्या जातात, असं रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

रिपोर्टमध्ये कोरोना संकटातील बातम्यांचा देखील संदर्भ देण्यात आला होता. कोरोनाने महिलांच्या रोजच्या जीवनात कशाप्रकारे बदल केला, या संकटाविरोधात लढताना महिलांची काय भूमिका राहिली याबाबत काहीच नव्हतं. कोरोना संकटात जगभरात महिलांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. हेल्थ केअर सेंटरमध्ये रुग्णांची काळजी घेणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या 70 टक्के होती, असं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं.

यानंतर बिल एंड मिलिंडा गेट्स फाउंडेशनचा एक नवा रिपोर्ट समोर आला. या रिपोर्टमध्ये देखील जगभरातील मीडिया महिलांना गृहित धरुन बातम्या छापते, असं म्हटलं आहे. सर्वाधित बातम्या तर पुरुषांद्वारे पुरुषांच्या नजरेने आणि पुरुषांसाठी लिहिल्या जातात. विशेष म्हणजे बातम्यांना वाचणारेदेखील पुरुषच आहेत. 178 पानी या रिपोर्टचं नाव ‘द मिसिंग पर्सपेक्टिव्ह ऑफ वूमेन इन न्यूज’ असं आहे.

या रिपोर्टनुसार 2000 सालापासून न्यूजरुममध्ये महिलांच्या संख्येमध्ये विशेष वाढ झाली नाही. विशेष म्हणजे मुख्यपदांवरील महिलांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळेच महिलांशी संबंधित मुद्दे, समस्या, त्यांच्या दृष्टीकोनाच्या बातम्या जास्त आढळत नाहीत.

जगभरातील सहा देशांच्या न्यूजरुमचा सर्व्हे करुन हा रिपोर्ट बनवण्यात आला. यामध्ये अमेरिका, यूके, भारत, केनिया, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

“21 व्या शतकात सर्वाधिक बातम्या पुरुषच लिहितात. त्याचबरोबर पुरुषच बातम्या वाचतात. याबाबत महिलांची संख्या अजूनही कमी आहे”, अशी प्रतिक्रिया या रिपोर्टच्या लेखिका आणि इंटरनॅशनल ऑडियंस स्ट्रेटेजी कंसल्टेंसीच्या संस्थापक लुबा कासोवा यांनी दिली. गेल्या एक दशकात या स्थितीत कोणत्याही प्रकारचा सुधार झाला नाही, असंदेखील लुबा कासोवा म्हणाल्या.

पुरुषसत्ता हेच यामागे मूळ कारण आहे, असं कोसोवा म्हणाल्या. बातम्यांमध्ये तज्ज्ञ लोकांचा जो उल्लेख केला जातो त्यामध्येदेखील महिलांचंप्रमाण सहा टक्के कमी आहे. काही वेळा तर महिलांसंबंधित बातमी असली तरी महिलांची प्रतिक्रिया घेतली जात नाही, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

25 वर्षापूर्वी मीडिया हे पुरुषांचं जग होतं, आतादेखील ते पुरुषांचंच जग आहे. बीजिंग डिक्लेरेशननंतरही यामध्ये फारसा बदल झाला नाही. 25 वर्षांपूर्वी1995 साली बीजिंग डिक्लेरेशन स्थापन झालं होतं. यामध्ये 189 देशांनी स्वाक्षरी केली होती. लिंग समानता बाबत मुख्य पावलं उचलण्याबाबत निर्णय झाला होता. संपूर्ण जगात लिंग समानत मानणारा समाज नर्माण करण्याचं लक्ष्य होतं. मात्र, 25 वर्षांनंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. पुरुषांचं वर्चस्व कायम आहे.

महिला वाचकांच्या संख्येतही निराशाजनक परिस्थिती आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने एक बातमी केली होती. या बातमीत महिला वाचकांच्या संख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर ‘द गार्डियन’नेदेखील यासंबंधित बातमी करुन महिला वाचकांच्या संख्येवर चिंता जाहीर केली होती.

यूनिव्हर्सिटी ऑफ मिसूरी-कोलंबिया आणि यूनेस्कोच्या एका रिपोर्टमध्ये आणखी एक महत्त्वाची बाजू समोर आली आहे. मिसूरी-कोलंबियाने जवळपास 40 हजार पेक्षा जास्त बलॉग्सचा अभ्यास करुन रिपोर्ट तयार केला. या रिपोर्टमध्ये पुरुषांच्या ब्लॉग्स पेक्षा महिलांच्या ब्लॉग्सवर टीका करणाऱ्या कमेंट, अश्लील कंमेंटची संख्या जास्त होती, असं निदर्शनास आलं. महिलांच्या ब्लॉग्सवर वाईट कमेंटचं प्रमाण जवळपास 56 टक्के असल्याचं यूनेस्कोच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

महिला वाचकांची संख्या वाढावी, अशी प्रत्येक मीडिया संस्थेची इच्छा असते. मात्र, यासाठी महिलांसंबंधित बातम्यांना जास्त प्राधान्य द्यावं लागेल. महिलांच्या दृष्टीकोनाने बातम्या द्याव्या लागतील. महिलांचा आवाज वाचकांपर्यंत पोहोचवावा लागेल. महिला तेव्हाच येणार जेव्हा त्यांना वाटेल की, ही जागा आपली आहे, आपल्यासाठी आहे आणि आपल्याद्वारे आहे. तरंच महिला वाचकांची संख्या वाढेल (bill and melinda gates foundation report says women perspective is missing in news).

हेही वाचा : बार्टीकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन थकले, आमरण उपोषण करण्याची वेळ

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.