Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबईच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. (bjp leader atul bhatkhalkar slams shivsena over bmc elections)

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 7:25 PM

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबईच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच मुंबई महापालिका कुणाची? या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत वाकयुद्ध रंगले आहे. त्यामुळे आतापासूनच मुंबईतील राजकारण तापू लागल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. (bjp leader atul bhatkhalkar slams shivsena over bmc elections)

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईत आल्यावर भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होईल, असं भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलं. हैदराबादच्या निकालाची मुंबईतही त्याची पुनरावृत्ती होईल. तिन्ही पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र आले तरी महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल, असा दावा भातखळकर यांनी केला आहे.

त्यांच्या आंदोलनाने कोरोना वाढणार नाही का?

पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सरकारने लावलेल्या जिझिया करामुळे वाढले आहेत. तरीही विरोधकांकडून त्यावर आंदोलन केलं जात आहे. आंदोलने केल्याने कोरोना वाढेल म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. आता तुमच्या आंदोलनामुळे कोरोना वाढणार नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी अजून बारा महिने बाकी आहेत. त्यासाठी भाजपने दिग्गज नेते मैदानात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुंबईनेही शिवसेनेलाच निवडून देण्याचा निश्चय केला आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मतदान करण्यात आलं. त्यामुळे यावेळीही महाविकास आघाडीलाही मतदान होईल आणि पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

नड्डा 18 डिसेंबरला मुंबईत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. नड्डा तीन दिवस मुंबईतच तळ ठोकणार आहेत. यावेळी ते महाराष्ट्रासह मुंबईतील भाजपच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मॅरेथॉन बैठका घेऊन अनेक सूचना करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यावेळी ते मुंबईतील भाजपचे सर्व नगरसेवक, आमदार आणि खासदारांशीही संवाद साधणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच भाजपच्या मुंबई कार्यकारिणीने निवडणुकीची काय तयारी केली आहे याचाही आढावा ते घेणार आहेत. (bjp leader atul bhatkhalkar slams shivsena over bmc elections)

महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना ९४

भाजप ८२

काँग्रेस २९

राष्ट्रवादी ८

समाजवादी पक्ष ६

मनसे १ (bjp leader atul bhatkhalkar slams shivsena over bmc elections)

संबंधित बातम्या:

भाजपचं ‘मिशन मुंबई महापालिका’, मुंबईत विजयाचा ‘हैदराबाद पॅटर्न?’; जेपी नड्डांच्या तीन दिवस मॅरेथॉन बैठका!

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

मुंबई महापालिकेची रुग्णालये दुर्लक्षित, डायबिटीजचे दररोज 26 बळी, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

(bjp leader atul bhatkhalkar slams shivsena over bmc elections)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.