27 गावांची सुपारी घेऊनच आयुक्त केडीएमसीत दाखल झाले, भाजप नेत्याचा घणाघात
महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी महापालिकेच्या निधीतून 18 गावांमध्ये सुरु असलेली विकासकामे थांबवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे भाजप नेते मोरेश्वर भोईर आक्रमक झाले आहेत (BJP leader Moreshwar Bhoir on KDMC Commissioner).
ठाणे : कल्याण-डोंबिलवी महापालिकेतील (केडीएमसी) 27 गावांपैकी 18 गावांमधील 13 नगरसेवकांची पदे नुकतेच रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर आता महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी महापालिकेच्या निधीतून 18 गावांमध्ये सुरु असलेली विकासकामे थांबवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे भाजप नेते मोरेश्वर भोईर आक्रमक झाले आहेत (BJP leader Moreshwar Bhoir on KDMC Commissioner).
“आयुक्त विजय सुर्यवंशी 27 गावांची सुपारी घेऊनच महापालिकेत दाखल झाले आहेत”, असा घणाघात मोरेश्वर भोईर यांनी केला. 27 गावांपैकी ज्या 18 गावांमधील 13 नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे, त्यामध्ये मोरेश्वर भोईर यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्तांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आह (BJP leader Moreshwar Bhoir on KDMC Commissioner).
हेही वाचा : केडीएमसीतून 18 गावं वगळल्यानंतर आता 13 नगरसेवकांचं नगरसेवकपदही रद्द
केडीएमसीतील 27 गावांपैकी 18 गावे केडीएमसीतून वगळण्यात आले आहेत. या गावांची कल्याण उपनगर नररपरिषद स्थापन केली जाणार आहे. या गावांमधील 13 नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी गेल्या आठवड्यात घेतला. या निर्णयाविरोधात मोरेश्वर भोईर यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे.
केडीएमसीतील 27 गावांतील 18 गावं ही महापालिकेतून वगळण्यात आल्यानं या गावातील नगरसेवकांचं पदही रद्द करा, असा अहवाल केडीएमसीच्या निवडणूक विभागाने आयुक्त विजय सुर्यवंशी यांना पाठवला होता. त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्याने मुदत संपण्यापूर्वीच तिथल्या नगरसेवकांचं पद रद्द झालं. या नगरसेवकांमध्ये मोरेश्वर भोईर यांचादेखील समावेश आहे.
मोरेश्वर भोईर यांच्यासह रमाकांत पाटील, सोनी अहिरे, प्रभाकर जाधव, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे, जालिंदर पाटील, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनिता खंडागळे अशा एकूण 13 नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द झालं आहे.