उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं, नारायण राणेंचा घणाघात

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, असा हल्लाबोल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं, नारायण राणेंचा घणाघात
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 4:42 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नाववर 56 आमदार निवडून आले. ते नसते तर 25 आमदारही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. (BJP MP Narayan Rane criticized on Chief Minister Uddhav Thackeray)

माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची आब राखली. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, असा हल्लाबोल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला. कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5521 रुपयांची घसरण

राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यांनी कालच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. कोरोनावर तर ते बोललेही नाही. देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. (BJP MP Narayan Rane criticized on Chief Minister Uddhav Thackeray)

राणेंच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे

– कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले – कोरोनाच्या काळात पिंजऱ्यात बसून, मुख्यमंत्री घरात बसून? – शेण खातो आणि गोमूत्र पितो अशी भाषा? ही कसली भाषा? निषेध करतो, ही भाषा बदलली नाही तर आमचाही तोल जाईल, मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन – सुशांतची आत्महत्या नाही, खून आहे, किती लपाल, किती वाचायचा प्रयत्न कराल, पोलिसांचा वापर करुन मुलाला वाचवलं, सत्तेचा दुरुपयोग केला, दिशाचे हत्या प्रकरणही बाहेर येईल, बलात्कार कोणी केला ते समजेल – पंतप्रधानांच्या कामाबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही, त्यांनी महाराष्ट्र सांभाळावा, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, भाषणात कॉमा वापरत नाहीत, फुलस्टॉप वापरत नाहीत – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा राखली, उद्धव ठाकरेंचं भाषण अपवाद ठरले, दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड, अर्थव्यवस्था, कोरोना यांचा उल्लेखही नाही : नारायण राणे

सर्वसामान्यांसाठी Good News! 600 गाड्यांची आवक झाल्याने भाज्या स्वस्त, वाचा काय आहेत भाव

(BJP MP Narayan Rane criticized on Chief Minister Uddhav Thackeray)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.