कराडमधील मलकापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा धुरळा उडाला!

सातारा : पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झालीय. हा प्रचार लोकसभा निवडणुकीचा नाहीय, तर कराडमधील मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा आहे. या नगरपालिकेच्या प्रचाराला भाजपने सुरुवात केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. शिवाय, मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका झाल्यानंतर […]

कराडमधील मलकापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा धुरळा उडाला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

सातारा : पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झालीय. हा प्रचार लोकसभा निवडणुकीचा नाहीय, तर कराडमधील मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा आहे. या नगरपालिकेच्या प्रचाराला भाजपने सुरुवात केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. शिवाय, मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीचं महत्त्व सुद्धा वाढलं आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची गेल्या 15 वर्षांपासून मलकापूर नगरपंचायतीवर सत्ता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर होणाऱ्या या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना रोखण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आणि भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांनी मलकापुरात प्रचाराची सूत्र हातात घेतली आहेत. काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढत असल्याने दोघांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. सध्या भाजपाने आपणच सत्ता स्थापन करणार, असा विश्वास व्यक्त करत आहे. भाजप सरकारच्या मदतीने मलकापूरला स्मार्ट सिटी बनवू, असा दावा डॉ. अतुल भोसले यांनी केला आहे.

वाचा : विलासरावांचा जावई थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना टक्कर देणार

काँग्रेसच्या सत्ता काळात एकाधिकारशाही आणि चुकीचे नियोजनामुळे मलकापूर शहराची अधोगती झाली असून, याविरोधात ही निवडणूक लढवली जात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रचारप्रमुखांनी दिली.

मलकापूर हा पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या ठिकाणी जोर लावला आहे. डॉ. अतुल भोसले यांनी मलकापूर शहरात घरोघरी जाऊन मतदार भेटीचा धडाका लावला आहे.

या निवडणुकीसाठी 27 जानेवारीला मतदान होणार असून 9 प्रभागातून 19 उमेदवार निवडायचे आहेत. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

पंढरपुरात ठरलं, पृथ्वीबाबांना कराडमध्ये पाडायचं, अतुल भोसलेंना निवडायचं!

कराड नगरपरिषद निवडणूक जाहीर, माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....