करण जोहरच्या पार्टी व्हिडीओमुळे ड्रग्ज प्रकरणात खळबळ, बडे अभिनेते रडारवर

ड्रग्ज प्रकरणात तपास करत असलेली NCB या रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहे. कारण, या रिपोर्टनंतर बॉलिवूडच्या अनेक बड्या नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. Bollywood drugs karan johar party video ncb

करण जोहरच्या पार्टी व्हिडीओमुळे ड्रग्ज प्रकरणात खळबळ, बडे अभिनेते रडारवर
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 7:04 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण, ड्रग्ज प्रकणात चौकशी सुरू असताना सुप्रसिद्ध निर्माता करण जोहर याच्या घरातील एका पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवन करण्यात आलं असल्याचा आरोप होत असताना आता या पार्टीचा एफ एस एलकडून महत्त्वाचा रिपोर्ट समोर येणार आहे. (Bollywood drugs connection karan johar party video ncb waiting for report)

ड्रग्ज प्रकरणात तपास करत असलेली NCB या रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहे. कारण, या रिपोर्टनंतर बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. या पार्टीत ड्रग्सचा वापर केल्याचा आरोप होत आहे. अशात करण जोहर हे फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्याच्या धर्मा प्रोडक्शनने यापूर्वी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे रिपोर्टमध्ये नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

करण जोहरच्या घरातील पार्टीचा व्हिडीओ व्हायरल 23 एप्रिल 2019 रोजी करण जोहरच्या घरी मोठी पार्टी झाली होती. या पार्टीला रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आदी अनेक बडे स्टार अभिनेते आणि अभिनेत्या हजर होत्या. या पार्टीत ड्रग्सचा वापर केल्याचा आरोप झाला आहे. त्या अनुषंगाने एनसीबीचे अधिकारी तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

या पार्टीच्या व्हिडीओबाबत सुरुवातीला संशय व्यक्त केला गेला होता. यामुळे हा व्हिडीओ खरा आहे की खोटा हे पाहण्यासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मुंबईच्या एफ एस एलमध्ये पाठवला होता. मुंबईच्या एफ एस एलने हा व्हिडीओ खरा असल्याचा अहवाल दिला होता. मात्र, विडिओ खरा असला तरी व्हिडीओतील सगळ्यांची अद्याप ओळख पटली नाही. इतर आणखी ही तपासाच्या अनुषंगाने मुद्दे आहेत. यामुळे करण जोहरच्या पार्टीचा हा व्हीडिओ आता दिल्लीच्या एफ एस एलकडे तपासणीसाठी पाठवला आहे. (Bollywood drugs connection karan johar party video ncb waiting for report)

दिल्ली एफ एस एलकडून येत्या 2-3 दिवसात रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. करणं जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत कोण-कोण अभिनेते, अभिनेत्री हजर होत्या याची स्पष्टता झाल्या नंतर त्यांनाही चौकशीसाठी बोलावलं जाण्याची श्यक्यता आहे. दरम्यान, या रिपोर्टची आम्ही वाट पाहत असून अहवाल हाती आल्यानंतर आम्ही कारवाई बाबत पुढील प्लान करू, अशी माहिती एनसीबीच्या झोनल कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या –

Special Report | ड्रग्ज कनेक्शनमध्ये नवा खुलासा होणार? करण जोहरचीही NCB चौकशी होणार?

Drug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ

(Bollywood drugs connection karan johar party video ncb waiting for report)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.