दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्रसरकार तिकडे व्यस्त राहिल; परिणामी ‘याचे’ दर वाढणार नाहीत, असा टोला सुप्रिया सुळेंनी कोणाला लगावला
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वच घटकांना महागाईचा फटका बसला आहे. त्यामुळे वेळोवेळो इंधनाचे दर कमी करण्याची मागणी होऊनही त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याचमुळे सुप्रिया सुळे यांनी उपरोधिक टोला लगावत केंद्र सरकारला निवडणुकांच्या कामात व्यस्त ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
दिल्लीः जेव्हा निवडणूका असतात तेव्हा केंद्र सरकार (Central Government) गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये (Gas, petrol-diesel rates) वाढ करत नाही. त्यामुळे आपण दर महिन्याला निवडणूक (Election) लावा म्हणजे केंद्रसरकार निवडणुकांमध्ये व्यस्त राहिल. त्याचा फायदा जनसामान्याना होईल. केंद्र सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त राहिल्यास गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत अशी टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केली. सध्या महागाईने सर्वच क्षेत्रात कळस घाटला आहे. गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत असल्याने जनसामान्याचे जिणं मुश्किल झाले आहे.
लोकसभेत गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मांडला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जनसामान्यांच्या खिशाला आर्थिक फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की, त्याचा परिणाम महागाईवर होतो. त्यामुळे आर्थिक गणितही कोलमडले जाते. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी उपरोधिक टोला मारत आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्रसरकार निवडणुकांमध्ये व्यस्त राहिल आणि त्याचा फायदा म्हणजे गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार नाही असा लगावला.
इंधनांच्या दराचा भडका
नुकताच पाच राज्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. ज्या वेळी या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर कित्येक दिवस इंधनांचा दर हा स्थिर असल्याप्रमाणेच होता. पाच राज्यातील निवडणुका झाल्यावर मात्र देशात इंधनांच्या दराचा भडका उडाला. सध्या पेट्रोलच्या दरात रोज वाढ होत असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
महागाईचा कहर
केंद्रसरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमत देऊन विजयी केले. पण निवडणूका संपताच केंद्रसरकारने पेट्रोल,डिझेल आणि गॅसची दरवाढ प्रचंड केली आहे. महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आली असल्याचा आरोपही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.
केंद्र सरकारचे दुर्लक्ष
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वच घटकांना महागाईचा फटका बसला आहे. त्यामुळे वेळोवेळो इंधनाचे दर कमी करण्याची मागणी होऊनही त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याचमुळे सुप्रिया सुळे यांनी उपरोधिक टोला लगावत केंद्र सरकारला निवडणुकांच्या कामात व्यस्त ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
संबंधित बातम्या
दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले, केंद्राचे नवे नियम काय?
Money Laundering Case: नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहे?; मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याशी कनेक्शन काय?