बुलडाण्यात आमदार राहुल बोंद्रे आणि श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांचा राडा
बुलडाणा: बुलडाण्यातील चिखली इथं एका कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा झाला. या राडेबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला, मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने 6 पोलीस जखमी झाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तसंच भाजप नेत्या श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. काय आहे प्रकरण? चिखली […]
बुलडाणा: बुलडाण्यातील चिखली इथं एका कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा झाला. या राडेबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला, मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने 6 पोलीस जखमी झाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तसंच भाजप नेत्या श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
चिखली तालुक्यातील धोत्राभनगोजी इथे एका शाळेला आयएसओ मानांकन मिळाल्यामुळे इथे कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे आणि भाजप नेत्या, तसेच जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्या भाषणातून शाब्दिक वादावादी झाली. श्रेयवादातून दोघांनी एकमेकांना टोमणे लगावले.
या वादावादीमुळे भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यातूनच एका भाजपा कार्यकर्त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण झाली. यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी पोलीस स्टेशन परिसरात हजारांहून अधिक जमाव जमला. मात्र आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमुळे कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत 6 पोलीस जखमी झाले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर चिखलीतील राजकारण चांगलेच तापल्याचं या प्रकारावरुन दिसून येतं. काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे आणि महिला बालकल्याण समिती सभापती श्वेता महाले यांच्यामध्ये खटके उडण्याची मालिका सुरु झाली आहे. धोत्राभनगोजी इथे घडलेल्या घटनेचे पडसाद, शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर या दोन्ही नेत्यांची बाचाबाची पोलीस स्टेशनमध्येही सुरु होती.
बुलडाण्यात आमदार राहुल बोंद्रे आणि श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांचा राडा https://t.co/9nEiqnAC71 pic.twitter.com/v8clsD9BKM
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 23, 2019