China locksdown Lanzhou: चीनमध्ये कोरोनाचा हाहा:कार! लांझोउ शहरात लॉकडाऊन
गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि आतातर चीनने पुन्हा लॉकडाऊन लावायला सुरूवात केली आहे. एका आठवड्यात चीनमध्ये कोविडचा संसर्ग 11 राज्यांमध्ये पसरलेला आहे.
बीजिंग : संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गाच्या खाईत लोटणाऱ्या चीनमध्ये नव्यानं कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झालीय. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि आतातर चीनने पुन्हा लॉकडाऊन लावायला सुरूवात केली आहे. एका आठवड्यात चीनमध्ये कोविडचा संसर्ग 11 राज्यांमध्ये पसरलेला आहे. (china battles new covid outbreal locksdown lanzhou city)
लांझोउत लॉकडाऊन
चीनने 40 लाख लोकसंख्या असलेल्या लांझोउ शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अतिआवश्यकता असली तरच घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. प्रशासनाने संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर करोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा संक्रमण असलेल्या नागरिकांना विलगीकरणात ठेवले जात आहे.
VIDEO: Beijing residents queue for Covid-19 tests as China battles a new outbreak of the virus.
People have been advised not to leave the city unless necessary, although regular transport services out of Beijing continue as normal pic.twitter.com/GYxtKbRpeq
— AFP News Agency (@AFP) October 26, 2021
पर्यटन स्थळे बंद
चीनने उत्तर-पश्चिमेकडचा गन्सू प्रांतांतील सर्व पर्यटन स्थळे बंद केली. गन्सू प्रांत पर्यटनावरच मुख्य प्रमाणात अवलंबून आहे, मात्र वाढती रुग्णसंख्या बघता हा निर्यण घेण्यात आला. काही दिवसांपूर्वीच बीजिंगमध्ये संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी हॉटेलमध्ये बुकींग घेण्यास बंदी घातली होती. कोरोनाचं संकट वाढलेल्या प्रांतामधील विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. झियान आणि लांझोऊ प्रांतातील 60 टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या. इरेनहोत आणि इनर मंगोलिया या दोन्ही शहरांतर्गत वाहतूक रद्द करण्यात आली होती.
कोणते भाग प्रभावित?
मिळालेल्या माहितीनुसार नवे कोरोना रुग्ण हे वयस्कर जोडप्यांशी संबंधित आहे. शांघाय, झियान गन्सू आणि मंगोलिया प्रांतात त्या जोडप्यानं प्रवास केल्याचं समोर आलंय. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांनाही संसर्ग झाल्याचं समोर आलं असून, चीनची राजधानी बीजिंगमध्येही काही रुग्ण आढळून आलेत.
बीजिंग ऑलिंपिकसाठी चिंता वाढली
कोरोना महामारीविरोधात झिरो टॉलरेन्स पॉलिसी आहे, ज्यात लॉकडाऊन, विलगीकरण, अनिवार्य कोविड चाचणी या सारख्या धोरणांचा समावेश आहे. बीजिंगमध्ये फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या प्रवासी आणि पर्यटन ग्रुप्समुळे कोरोना वायरसच्या डेल्टा वेरिएंटचा प्रसार होण्याची चिंता चीनला सतावतेय. परदेशी प्रेक्षकांना आधीच बंदी आहे आणि खेळात सहभागी होणाऱ्यांनी बाहेरील लोकांपासून वेगळे करणाऱ्या बबलमध्ये (bubble) राहावे लागणार आहे.
इतर बातम्या
Pegasus Spying:स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आदेश
Bangladesh Voilence: फेसबुक फॉलोवर्स वाढवण्यासाठी बांगलादेश हिंसा भडकली?, नेमकं काय घडलं?
(china battles new covid outbreal locksdown lanzhou city)