मुंबईत आईस्क्रीम विक्री, मीडिया हाऊस ते चित्रपट निर्मिती, सुशांत प्रकरणाशी संदीप सिंहचा संबंध काय?

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा निर्माता संदीप सिंहचं भाजप कनेक्शन काय आहे? असा सवाल काँग्रेसने केला आहे (Congress allegation on Sandeep Singh in Sushant Singh Rajput Suicide case).

मुंबईत आईस्क्रीम विक्री, मीडिया हाऊस ते चित्रपट निर्मिती, सुशांत प्रकरणाशी संदीप सिंहचा संबंध काय?
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 10:48 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळ्या अँगलनं तीन तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे. मात्र सुशांतचा मित्र संदीप सिंहवरुन आता राजकारण तापलं आहे. विशेष म्हणजे संदीप सिंहवरही मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप होत आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा निर्माता संदीप सिंहचं भाजप कनेक्शन काय आहे? असा सवाल काँग्रेसने केला आहे (Congress allegation on Sandeep Singh in Sushant Singh Rajput Suicide case).

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चॅटवरुन ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर भाजपकडून सरकारवर हल्लाबोल सुरु आहे. मात्र आता काँग्रेसचे नेते सचिन सावंतांनी संदीप सिंहचे फडणवीसांसोबतचे फोटो शेअर करुन, भाजपच्या अँगलवरुनही चौकशी करण्याची मागणी केली आहे (Congress allegation on Sandeep Singh in Sushant Singh Rajput Suicide case).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे. संदीप सिंह हे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे निर्माते आहेत, ज्या सिनेमाचे पोस्टर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी लाँच केले होते. त्यामुळे संदीप सिंहचं भाजप कनेक्शनही तपासा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

सचिन सावंतांच्या आरोपांना खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच उत्तर दिलं आहे. मुंबई पोलिसांनी संदीप सिंह यांची चौकशी का केली नाही? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

संदीप सिंह कोण आहे?

संदीप सिंह सुशांतचा मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे. संदीप सिंहचे सुशांतसोबतचे फोटोही व्हायरल होत आहे. पोस्टमार्टेमच्या दिवशी संदीप सिंह सुशांतची बहीण मितू सिंह आणि त्यानंतर अंकिता लोखंडेसोबतही दिसला होता.

संदीप सिंह हा बिहारच्या मुजफ्फरपूरचा आहे. त्याने मुंबईत सुरुवातीला आईस्क्रीमही विकली, अशी माहिती समोर येत आहे. संदीप सिंहला पत्रकार व्हायचं होतं. त्यामुळे त्याने सुरुवातीला काही मासिकं आणि मीडिया हाऊसमध्येही काम केलं. रेडिओमध्ये काम करताना त्याची सेलिब्रिटींशी ओळख झाली. त्याने 2007 मध्ये ‘सावरिया’ चित्रपटाच्यावेळी संजय लीला भंसाळींसोबत काम केलं. त्याने 2015 मध्ये भंसाळींची कंपनी सोडली. त्यानंतर तो स्वत: निर्माता झाला. अलिगड, भूमी, सरबजित, आणि पीएम नरेंद्र मोदी यांसारखे चित्रपट काढले

पोस्टमार्टेमपासून ते अंत्यविधीपर्यंत संदीप सिंह सुशांतच्या कुटुंबीयांसोबत होता. मात्र संदीप सिंहच मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. संदीप सिंहनेच पोलिसांच्या मदतीने आपल्याला कूपर रुग्णालयातून बाहेर काढल्याचा आरोप कूपर रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

सुशांतचा मित्र असल्याचं संदीप सिंहही सांगत असला तरी, वर्षभर संदीप सुशांतला भेटलाच नव्हता, अशीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता याच संदीप सिंहवरुन काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना सुरु झाला आहे.

संबंधित बातमी : CBI Inquiry | आठव्या दिवशी रियाचा सीबीआयशी सामना, चौकशीत नेमकं काय झालं?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.