Alert: ओमिक्रॉनच्या चिंतेने औरंगाबाद पुन्हा अलर्ट, रेल्वे, विमान प्रवाशांची कोरोना टेस्ट, कार्यक्रमांवर कोणते निर्बंध?
औरंगाबादः जगात थैमान घातलेल्या ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या (Corona) व्हेरिएंटने जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने शहरात 1 डिसेंबरपासून नवी नियमावली जारी केली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार भयंकर वेगाने होत असल्याने नागरिकांनी लसीकरण (Vaccination) करुन घेण्यावर प्रशासन जास्त भर देत आहे. तसेच रेल्वे आणि विमानतळावर […]
औरंगाबादः जगात थैमान घातलेल्या ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या (Corona) व्हेरिएंटने जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने शहरात 1 डिसेंबरपासून नवी नियमावली जारी केली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार भयंकर वेगाने होत असल्याने नागरिकांनी लसीकरण (Vaccination) करुन घेण्यावर प्रशासन जास्त भर देत आहे. तसेच रेल्वे आणि विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याची प्रक्रियादेखील सुरु करण्यात आली आहे.
रेल्वे व विमान प्रवाशांची चाचणी
दिल्ली आणि हैदराबादहून येणाऱ्या विमान प्रवाशांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र विचारले जाते. ज्यांच्याकडे ते नाही, अशा प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येत असल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पूर्वी केवळ सचखंड एक्सप्रेसने औरंगाबादेत येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत होती. मात्र आता दिवसभर बेजबाबदारपणे वागणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्राधान्याने तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या पथकाकडून औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सकाळी 9 ते रात्री 9 वाजेदरम्यान प्रवाशांची अओँटिजन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. तसेच मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठवला जात आहे.
कार्यक्रमांवर कोणते निर्बंध?
चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृहात आदी ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमात एकूण क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच परवानगी दिली जाईल. खुल्या जागेतील कार्यक्रमांना क्षमतेच्या 25 टक्केच परवानगी असेल. एखाद्या मैदान किंवा स्टेडियममधील समारंभातील उपस्थितांची संख्या ठरवण्याचा अधिकारी जिल्हा प्रशासनाला आहे. मैदाने, स्टेडियममध्ये 1 हजारपेक्षा जास्त नागरिकांची गर्दी असेल तर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याचे पर्यवेक्षण करेल व नियमांचे उल्लंघन झाल्यास कार्यक्रम बंद केला जाईल.
इतर बातम्या