Corona LIVE | पवई झोपडपट्टीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, झोपडपट्टी सील

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर (Corona live update)

Corona LIVE | पवई झोपडपट्टीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, झोपडपट्टी सील
Follow us
| Updated on: Apr 03, 2020 | 5:02 PM

[svt-event title=”बोरिवलीत पहिला कोरोना रुग्ण आढळला” date=”03/04/2020,12:41PM” class=”svt-cd-green” ] बोरिवलीत पहिला कोरोना रुग्ण आढळला. बोरीवली (पश्चिम ) जुनी एम एच बी वसाहतीतील एका इमारतीत 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. काल रात्री लागण झाल्याचे निष्पन्न झाले. महिलेला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आलं. महिलेच्या पतीलही भाभा रुग्णालयात हलवलं आहे. दरम्यान इमारत सील करण्यात आली आहे. कटुंबातील अन्य सदस्य आणि इमारतीतील रहिवाशी क्वारंनटाईन करण्यात आली. [/svt-event]

[svt-event title=”पवई झोपडपट्टीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, झोपडपट्टी सील” date=”03/04/2020,12:36PM” class=”svt-cd-green” ] पवईच्या झोपडपट्टीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने, झोपडपट्टी सील करण्यात आली. तसंच या विभागातील संचारबंदी कडक करण्यात आली आहे. पवई विभागातील आयआयटी मार्केटनजीक चैतन्यनगर आहे. या नगरात पंचशील सोसायटी आहे. या सोसायटीत आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्याचं वय 35 वर्ष आहे. त्याला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल आणि पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी स्वतः परिसराला भेट दिली आणि आता हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुढचे तीन दिवस कोल्हापूरमध्ये पूर्णत: लॉकडाऊन” date=”03/04/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : जिल्ह्यात बहुतांश ग्रामीण भागात आजपासून तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन, ग्रामपंचायतींनी घेतला पुढाकार, वैद्यकीय सेवा वगळता इतर सेवा तीन दिवस राहणार बंद, भाजीपाला आणि दूध संकलनासाठी वेळ ठरवून दिला, शेतीचे कामेही तीन दिवस बंद, लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद [/svt-event]

[svt-event title=”लातुरमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची धरपकड, 80 जणांविरोधात गुन्हा दाखल” date=”03/04/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] लातुर शहर पोलिसांकडून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या 80 जणांची धरपकड, संचारबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल, जिल्हा प्रशासनाने कठोर कार्यवाहीच्या सूचना दिलेल्या असतानाही लोक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे, लातुर जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 12 जणांचा सध्या शोध सुरु [/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुळे नाशिकमधील रथयात्रा रद्द” date=”03/04/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : रामनवमी नंतर निघणारी उद्याची ऐतिहासिक रथयात्रा रद्द, 250 वर्षांची रथयात्रेची परंपरा यंदा पहिल्यांदाच होणार खंडित, नाशिकचे लाखो भाविक रथयात्रेत सहभागी होतात [/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई” date=”03/04/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] नालासोपारा : वसई, विरार, नालासोपाऱ्यात अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची मोठी कारवाई, 2 दिवसात टू व्हीलर, 4 व्हीलर, रिक्षा अशा 500 पेक्षा जास्त वाहनचालकांवर कारवाई, सर्व वाहन 3 महिन्यांसाठी जप्त [/svt-event]

[svt-event title=” नागपूरची भाजीमार्केट बंद” date=”03/04/2020,8:56AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : शुक्रवार निमित्ताने आज नागपूरातील भाजीबाजार बंद, विभागणी केलेल्या बाजारातही गर्दी अत्यल्प, नागपूरात मनपाने 24 ठिकाणी भाजी बाजाराची विभागणी केली, आज बंदच्या दिवशी काही शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीला, गर्दी कमी असल्यानं नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह” date=”03/04/2020,8:51AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह, दुपारपर्यंत त्याच्या दुसऱ्या नमुन्याचा रिपोर्ट अपेक्षित, रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास डिस्चार्ज रुग्णाला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता [/svt-event]

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.