Deepika Padukone | दीपिकाची चौकशी संपली; साडेपाच तासानंतर एनसीबीच्या कार्यालयातून रवाना

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची करण्यात आलेल्या साडेपाच तासाच्या चौकशीत दीपिकाने ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली आहे. मात्र तिने ड्रग्ज सेवन केल्याचं अमान्य केलं आहे.

Deepika Padukone | दीपिकाची चौकशी संपली; साडेपाच तासानंतर एनसीबीच्या कार्यालयातून रवाना
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 4:19 PM

मुंबई: ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची करण्यात आलेल्या साडेपाच तासाच्या चौकशीत दीपिकाने ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली आहे. मात्र तिने ड्रग्ज सेवन केल्याचं अमान्य केलं आहे. दीपिकापाठोपाठ सारानेही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी तिच्याकडून एनसीबीने फोनही काढून घेतला होता. तब्बल साडेपाच तासाच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर दीपिकाची चौकशी संपली आहे. ती एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडली असून घरी जाण्यासाठी रवाना झाली आहे. (Deepika Padukone reaches NCB office)

आज सकाळी पावणे दहा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथील एनसीबीच्या कार्यालयात दीपिका हजर झाली. त्यानंतर बरोबर 10 वाजता तिची चौकशी करण्यात आली. चौकशी सुरू होण्यापूर्वी एनसीबीने तिचा फोन काढून घेतला. त्यामुळे तिला चौकशी सुरू असेपर्यंत कुणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नाही. दीपिकाची मॅनेजर करिश्माही 10 वाजता एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून दोघींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दीपिकासोबत अभिनेता आणि तिचा पती रणवीर सिंग नाही. त्यामुळे दीपिका एकटीच एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावं लागणार आहे.

एनसीबी गेस्ट हाऊसबाहेर बंदोबस्त

दीपिका एनसीबी गेस्ट हाऊसमध्ये येणार असल्यामुळे गेस्ट हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मीडियाने गर्दी करू नये म्हणून गेस्ट हाऊसबाहेर बॅरेकेड्स लावण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पाच अधिकाऱ्यांकडून चौकशी

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एकूण पाच अधिकारी दीपिकाची चौकशी करत आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून तिची चौकशी सुरू झाली असून एनसीबी कार्यालयात ती एकटीच असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दीपिका रात्रभर झोपली नाही, हॉटेलात थांबली

दीपिकाची आज चौकशी होणार असल्याने तिच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मीडियानेही तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, दीपिका रात्रभर तिच्या घरी नव्हती. ती रात्रभर मुंबईतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलात थांबली होती. मीडियाचा ससेमिरा चुकविण्यासाठीच दीपिका हॉटेलमध्ये थांबल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनसीबीकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दीपिकाने रात्रभर तिच्या वकिलांशी चर्चा केली. ती रात्रभर झोपली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Deepika Padukone reaches NCB office)

संबंधित बातम्या:

दीपिकाची चौकशी संध्याकाळपर्यंत चालणार; ‘हा’ मराठमोळा अधिकारी करणार तपास

सारा अली खानही घरी नाही; एनसीबी कार्यालयात दीड तास उशिराने पोहोचणार

Drugs Case LIVE | दीपिकाची तासाभरापासून चौकशी सुरु, सारा आणि श्रद्धा चौकशीसाठी पोहोचलेल्या नाहीत

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.