Summer Drink : ‘सब्जा’ शरीरासाठी अत्यंत गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !

उन्हाळ्याच्या हंगामात लिंबू पाणीमध्ये किंवा एखाद्या रसामध्ये आपण सब्जा खातो. मात्र, सब्जा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Summer Drink : 'सब्जा' शरीरासाठी अत्यंत गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !
सब्जा
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 4:57 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात लिंबू पाण्यामध्ये किंवा एखाद्या रसामध्ये आपण सब्जा खातो. मात्र, सब्जा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच आपण आहारात दररोज सब्जा घेतला तर अनेक आजार बरे होण्यास मदत होते. सब्जा हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतं. यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात जे त्वचेची रक्षा करतात. (Eating Sabja is beneficial for health)

सब्जामध्ये ओमेगा -3 , फॅटी अॅसिड्स, फायबर, प्रोटीन आणि सर्व आवश्यक अमिनो अॅसिड असतात. उन्हाळ्यात तर आहारात जास्तीत-जास्त सब्जाचा समावेश  केला पाहिजे. कारण सब्जाचे सेवन केल्याने आपले शरीर थंड राहण्यास मदत होते. सब्जाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आणि मॅग्नेशियम असतात. सब्जा हा वनस्पती-आधारित प्रथिने आहे. त्याचे सेवन केल्याने पोट भरते आणि भूक देखील नियंत्रणात राहते.

आपण दलियामध्ये मिसळून, अथवा पाण्यात टाकून याचे सेवन करू शकता. विशेष म्हणजे सब्जाने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. वजन कमी करण्यासाठी देखील सब्जा फायदेशीर आहे. फालूदा पेय हे थंड आणि गोड असते. हे आपण घरीही बनवू शकता. फालूदामध्ये सब्जा जास्त प्रमाणात वापरला जातो. फालूदा पेय बनवण्यासाठी आपल्याला सब्जा, साखर, गुलाब सरबत, शेवई, दूध, जेली आणि आईस्क्रीम आवश्यक असते. लिंबूयुक्त पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते.

उन्हाळ्यात घामामुळे शरीराचे अनेक घटक बाहेर पडतात. आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील शरीराबाहेर पडतात. दररोज एका ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने या घटकांची मात्रा शरीरात टिकून राहते. व्हिटामिन सी समृद्ध लिंबू पाणी त्वचा सुधारते. आठवड्यातून एकदा याचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. त्यामध्ये उपस्थित पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकते. जेव्हा जेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते, तेव्हा एक ग्लास लिंबू पाणी प्यायले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(Eating Sabja is beneficial for health)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.