खडसेंच्या अ‍ॅक्शनमुळे राष्ट्रवादीची चांदी, हळूहळू ‘असा’ लागेल भाजपच्या गडाला सुरूंग

खडसे हे 6 वेळा भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठी झळ बसेल आणि राष्ट्रवादीला मात्र बळ मिळणार आहे.

खडसेंच्या अ‍ॅक्शनमुळे राष्ट्रवादीची चांदी, हळूहळू 'असा' लागेल भाजपच्या गडाला सुरूंग
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 1:47 PM

जळगाव : जळगाव जिल्हा आणि एकनाथ खडसे हे समीकरणच आहे. सत्ता कुणाचीही असो, जिल्ह्यात गेल्या किमान 25 वर्षापासून खडसेंचे वर्चस्व आहे. एकनाथ खडसे हे 6 वेळा भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठी झळ बसेल आणि राष्ट्रवादीला मात्र बळ मिळणार आहे. इतकंच नाही तर खडसेंनी जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा खालसा करून गेल्या 30 वर्षांपासून त्या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकावला आहे. (Eknath Khadse NCP entry will lead changes in Jalgaon politics)

याशिवाय जिल्ह्यातील फैजपूर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर आणि वरणगाव नगरपालिका व नगर परिषदवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. दूध फेडरेशनचे अध्यक्ष पद हे खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी खडसेंची मुलगी रोहिणी खडसे आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीची पकड घट्ट होऊ शकते.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त एक जागा कमी आहे. त्यामुळे येत्या काळात अविश्वास प्रस्ताव आणून जिल्हा परिषदेतही सत्ता बदल होऊ शकतो. जिल्ह्यात 32 टक्के लेवा पाटील समाज असून समाजाचं मोठे पाठबळ राष्ट्रवादीला मिळेल, अशी चर्चा आहे. जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यात 20 मतदारसंघ आहेत. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव आदी मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा मतदारसंघात भाजप आमदार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, मतदारसंघात भाजप आमदार आहेत.

विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने मला एबी फॉर्म दिला होता; एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

जळगाव महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र, अनेक नगरसेवक खडसेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेत सत्तांतर होऊ शकतं. ग्रामीण भागात सावदा, यावल, भुसावळ नगरपालिकांमध्येही सत्ताबदल होऊ शकतो. (Eknath Khadse NCP entry will lead changes in Jalgaon politics)

खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानं अनेक आजी-माजी नेते त्यांचे समर्थक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा एक अंदाज बांधला जात असल्याने जळगाव महापालिकेवर असणारी भाजपची एक हाती सत्ता जाण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेत भाजप – 57, शिवसेना 15 तर एमआयएम 3 अशी पक्षीय बलाबल आहे.

“डेंजरपणे हिशेब चुकते करण्याची खडसेंची ख्याती, गिरीश महाजनांना थेट आव्हान”

तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा मिळवत भाजपने पुन्हा जिल्ह्यातील वर्चस्व सिद्ध केलं आहे. जिल्हा परिषदेतील एकूण 67 गटांपैकी भाजप 33, शिवसेना 14, राष्ट्रवादी 16 तर काँग्रेसने 4 जागांवर विजयी मिळवला आहे. एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व चारही जागांसह बोदवड तालुक्यातील दोन्ही जागांवर भाजपने यश मिळवलं आहे. पण आता खडसेंच्या जाण्यामुळे या सगळ्यांवर पाणी फेरणार आहे.

(Eknath Khadse NCP entry will lead changes in Jalgaon politics)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.