Aurangabad Gold: आज सोने पंचेचाळीशीच्या दिशेने… पाच वर्षात नव्वदी पार करणार, औरंगाबादचे काय आहेत भाव?

आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो.

Aurangabad Gold: आज सोने पंचेचाळीशीच्या दिशेने... पाच वर्षात नव्वदी पार करणार, औरंगाबादचे काय आहेत भाव?
गोल्ड एक्सचेंजचे नाव काय असेल - गोल्ड एक्सचेंज हे शेअर बाजारासारखे असेल. शेअर्सप्रमाणे ट्रेडिंगही करता येईल. तसेच, सोन्याची भौतिक डिलिव्हरी होईल, म्हणजेच सोने देखील खरेदी केले जाऊ शकते. सेबीने मसुद्याच्या प्रस्तावांमध्ये नमूद केले आहे की नवीन गोल्ड एक्सचेंजचे नाव इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट असेल.
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 6:19 PM

औरंगाबाद: देशांतर्गत आर्थिक सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संमिश्र परिणाममुळे सप्टेंबर महिन्यात सोन्याचे दर घटताना दिसत आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. गणपती-महालक्ष्मीच्या काळातही सोन्या-चांदीने  (Gold And Silver rate)फार काही प्रगती केली दिसली नाही. देश आणि आंतराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक सुधारणांमुळे शेअर बाजारात तेजी आलेली दिसून येत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांचा जास्त ओढा सोने-चांदीऐवजी शेअर्सकडे जास्त दिसून येत आहे. आज 27 सप्टेंबर रोजी तर सोन्याने सप्टेंबर महिन्यातील निचांकी पातळी गाठत 46 हजाराची पातळी ओलांडलेली दिसून आली.

औरंदाबादेत काय आहेत दर?

औरंगाबादच्या सराफा बाजारात आज सोमवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 45900 प्रति तोळा आहेत. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 63500 रुपये प्रति किलो असा नोंदला गेला. मागील महिन्यात 46 हजाराच्या पातळीवर फिरणारा सोन्याचा दर आज 45 हजाराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या- 

Gold Price: सोनं खरेदी करण्याची चांगली संधी; उच्चांकी भावापेक्षा दहा हजार रुपयांनी स्वस्त

सोन्याच्या प्रत्येक दागिन्यांना एक युनिक आयडी मिळणार, सरकारची जबरदस्त योजना

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.