AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसेंनी राज्यपालांना पाठवले पुस्तक, भगतसिंह कोश्यारी म्हणाले….

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी खडसे यांच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय कारकीर्दीचे कौतुक केले आहे (Governor Bhagat Singh Koshyari on Eknath Khadse book).

एकनाथ खडसेंनी राज्यपालांना पाठवले पुस्तक, भगतसिंह कोश्यारी म्हणाले....
| Updated on: Nov 24, 2020 | 11:46 PM
Share

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांचं आत्मचरित्रावर आधारित ‘जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाची प्रत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अवलोकनार्थ पाठवली होती. कोश्‍यारी यांनी या पुस्तकावर तातडीने आपला अभिप्राय लिहून पाठवला आहे. या अभिप्रायातून कोश्‍यारी यांनी खडसे यांच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय कारकीर्दीचे कौतुक केले आहे (Governor Bhagat Singh Koshyari on Eknath Khadse book).

“जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे हा डॉ. सुनिल नेवे यांनी लिहिलेला ग्रंथ प्राप्त झाला. पुस्तकाच्या माध्यमातून आपले व्यक्तीमत्व, आपले समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून योगदान यांसह आपल्या व्यापक सेवाकार्य यांचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला आहे. यानिमित्त मी आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणास सुयश चिंतितो”, असा अभिप्राय राज्यपालांनी दिला आहे.

“लेखक डॉ. सुनिल नेवे यांनी अभ्यासपूर्ण संशोधन करुन लिहिलेला हा ग्रंथ संग्रहणीय झाला आहे. त्याबद्दल त्यांचेदेखील मी अभिनंदन करतो”, असंदेखील राज्यपाल म्हणाले आहेत (Governor Bhagat Singh Koshyari on Eknath Khadse book).

एकीकडे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला असताना राज्यपालांनी खडसे यांचे कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचं 10 सप्टेंबर 2020 रोजी प्रकाशन झालं होतं. एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवर ऑनलाईन पद्धतीने पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागळे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता.

हेही वाचा :

योगी सरकारनं अयोध्या विमानतळाचं नाव बदललं, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असं नामकरण

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले; शिवसेनेचा भाजपला टोला

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.