AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tokyo Olympics 2021 : महिला हॉकी संघातील हरयाणाच्या खेळाडूंना बक्षिस, प्रत्येकी 50 लाख रुपये देऊन होणार सन्मान

भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलपर्यंत मजल मारली. पण काहीशा फरकाने आधी सेमीफायनल आणि त्यानंतर आज तिसऱ्या स्थानाच्या लढतीतही ब्रिटनकडून 4-3 ने पराभव पत्करावा लागला.

Tokyo Olympics 2021 : महिला हॉकी संघातील हरयाणाच्या खेळाडूंना बक्षिस, प्रत्येकी 50 लाख रुपये देऊन होणार सन्मान
भारतीय महिला हॉकी संघ
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 11:12 AM
Share

Tokyo Olympic 2021 : भारतीय महिला हॉकी संघाचं यंदा पदक जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिल. आधी सेमीफायनलमध्ये अर्जेंटीनाकडून आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत ग्रेट ब्रिटनकडून 4-3 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महिलांच कांस्य पदकाचं स्वप्नही तुटलं. पण या पराभवानंतरही त्यांनी ज्या जिद्दीने आणि मेहनतीने इथरवरचा प्रवास केला. त्यासाठी त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (CM ML Khattar) यांनी देखील ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics)  महिला हॉकी संघात असणाऱ्या (Women Hockey Team)  9 हरियाणाच्या खेळाडूंना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

टोक्यो ओलिम्पिकच्या मैदानात भारताचा महिला हॉकी संघ डिफेंडिंग चॅम्पियन ग्रेट ब्रिटनसोबत कांस्य पदकासाठी भिडत होता. सामन्याच्या पहिला मिनिटापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक रुप धारण केलं होतं. पहिला क्वार्टर ग्रेट ब्रिटनने गाजवला. परंतु या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं.

दूसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचे तीन गोल, 0-2 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाची कमाल

ब्रिटनने दुसऱ्या क्वार्टरची शानदार सुरुआत केली. सामन्याच्या 16 व्या मिनटाला ब्रिटनने पहिला गोल केला. Ellie Rayer ने फील्ड गोल केला. त्यामुळे भारत 0-1 ने पिछाडी पडला. तर 24 व्या मिनिटाला पुन्हा एकदा ब्रिटनने दूसरा गोल केला आहे. Sarah Robertson ने रिवर्स शॉटद्वारे हा गोल केला.

ब्रिटनने दोन गोल केल्यानंतरही भारताची टीम जराही विचलित झाली नाही. गुरजीत कौरने टीम इंडियाचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं. तिने लागोपाठ दोन गोल केले. गुरजीतने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. गुरजीतने 2 मिनिटांच्या आतमध्ये हे दोन्ही गोल केले. तिने पहिला गोल 25 व्या मिनिटाला केला तर दूसरा गोल 26 व्या मिनिटाला केला.

ब्रिटन भारतावर पूर्णपणे हावी झालेलं असताना भारताच्या महिला संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. पहिल्या क्वार्टरनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा शानदार खेळ मिळाला. पहिल्यांदा गुरजीत कौरने 3 मिनिटांत 2 करुन भारताचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं. लगोलग भारताने आणखी एक गोल केला. वंदना कटारियाने तिसरा गोल करुन सामन्यात चुरस आणली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये ब्रिटनकडून 1 गोल, ब्रिटन भारतीय संघावर ‘हावी’

ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टरची आक्रमक सुरुवात केली. पहिल्या दोन क्वार्टरसारखीच ब्रिटेनने या क्वार्टरची देखील आक्रमक सुरुवात केली. ब्रिटनने 32 व्या मिनिटाला गोल केला.

लागोपाठ ब्रिटनने तिसराही गोल केला. ब्रिटनकडून वेबने 35 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला भारताशी बरोबरी करुन दिली. यानंतर भारतला पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु गुरजीत कौरला गोल करण्यात अपयश आलं.

तिसरा क्वार्टर बिनदिक्कतपणे ब्रिटनच्या नावावर राहिला. ब्रिटनने या क्वार्टरमध्ये एक गोल केला. या क्वार्टरमध्ये गोलकीपर सविता पुनियाने शानदार बचाव केले. ब्रिटनकडून डायरेक्ट शॉटचे प्रहार केले गेले परंतु सविता पुनियाने खूप सुंदर डिफेन्स केले. तिसऱ्या क्वार्टरनंतर दोन्ही संघांचा स्कोअर आहे 3-3 होता…

चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला ब्रिटनने चौथा गोल केला. या गोलसह ब्रिटनने 4-3 ने आघाडी मिळवली. सामन्याच्या उर्वरित काही मिनिटे अतिशय थरार पाहायला मिळाला. परंतु भारताला गोल करण्यात अपयश आलं. सरतेशेवटी  ब्रिटनने भारताला 4-3 ने पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला.

हे ही वाचा :

Tokyo Olympic 2021 : पैलवान बजरंग पुनिया पदकापासून एक पाऊल दूर, सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश

रवी दहियाचं गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

(haryana government will Reward rs 50 lakhs each to the nine members of Indian Womens Hockey team from haryana in tokyo olympics)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.