11 डिसेंबर रोजी दवाखाने बंद राहणार; आएमएची राष्ट्रव्यापी बंदची हाक

केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे.

11 डिसेंबर रोजी दवाखाने बंद राहणार; आएमएची राष्ट्रव्यापी बंदची हाक
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 5:04 PM

मुंबई: केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. यावेळी त्यांनी उद्या दिवसभर सर्व दवाखाने बंद राहणार असल्याचं जाहीर केलं असून डॉक्टरांनीही दवाखाने बंद ठेवण्याचं आवाहन आयएमएने केलं आहे. त्यामुळे उद्या रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. (indian medical association holds nationwide one-day strike)

आयएमएने एक पत्रक काढून उद्या 11 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्या सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी आरोग्य यंत्रणेतील काही गोष्टी सुरळीत असणार आहे. त्यात अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, कोविड केअर सेंटर, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.

संप कशासाठी?

सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संस्थेनं एक नोटिफिकेशन काढलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यास शस्रक्रियेसाठी परवानगी दिली गेली आहे. नोटिफिकेशनमध्ये 58 प्रकारच्या शस्रक्रियांची परवानगी दिली गेलीय. यामध्ये साध्या शस्रक्रियांशिवाय मेंदूच्या शस्रक्रियेचाही समावेश आहे. यालाच इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केलाय. IMAच्या म्हणण्यानुसार ही ‘मिक्सोपॅथी’ असून यामुळं रुग्णांचं आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळंच हा संप पुकारण्यात आलाय. (indian medical association holds nationwide one-day strike)

‘या’ गोष्टी बंद ठेवण्याचं आवाहन

>> सर्व दवाखाने >> सर्व नॉन इमर्जंन्सी हेल्थ सेंटर >> सर्व ओपीडी >> इलेक्टिव सर्जरी

‘या’ गोष्टी सुरु राहणार!

>> अत्यावश्यक आरोग्य सेवा >> अतिदक्षता कक्ष >> कोविड केअर सेंटर >> सीसीयू >> अत्यावश्यक शस्रक्रिया (indian medical association holds nationwide one-day strike)

या गोष्टीला आक्षेप

>> आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरुध्द बंदचे आवाहन करण्यात आलं आहे.

>> आएमएचा विरोध आयुर्वेदाला नाही. पण वैद्यकीय शाखेची सरमिसळ करून होत असलेल्या ‘मिक्सोपथी’ला आहे.

>> सरकारने ही सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी

>> राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या चार समित्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत.

>> या आंदोलनात राज्यातील आयएमएच्या २१९ शाखांमधील ४५००० डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पंजीकृत असलेले एकूण 1 लाख 10 हजार डॉक्टर्स सहभागी होतील.

>> मेडिकल स्टुडंट्स नेटवर्क आणि आएमएच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे एबीबीएसचे शिक्षणारे महाराष्ट्रातील 36 सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 15000 वैद्यकीय विद्यार्थी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होतील.

>> राज्यातील खासगी आणि सरकारी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे 15000 विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. (indian medical association holds nationwide one-day strike)

संबंधित बातम्या:

औषधी गुणधर्म असलेल्या ‘या’ घरगुती गोष्टी वापरा, सर्दी खोकल्यापासून होईल सुटका

कोरोनाची लस घेतल्यानंतर अॅलर्जी?; लस कुणी घ्यावी? कुणी घेऊ नये?

सीरम-भारत बायोटेकने लसीसंदर्भात सविस्तर माहिती द्यावी; तज्ज्ञ समितीची मागणी

(indian medical association holds nationwide one-day strike)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.