PHOTO | राज्यभरात भाऊबीजेचा उत्साह, जलसंपदा मंत्री जयंत पाटील बहिणीच्या भेटीसाठी नगरला
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज अहमदनगरला येऊन भाऊबीज साजरी केली (Jayant Patil Celebrate Bhaubij).
"भाऊबीजमुळे भेटीगाठी होतात. भेटीत गप्पा होतात. पण त्या घरगुती गप्पा असतात, राजकीय गप्पा नसतात", असं देखील जयंत पाटील यांनी सांगितलं.
Follow us
राज्यभरात भाऊबीजेचा उत्साह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील आज अहमदनगरला येऊन भाऊबीज साजरी केली.
जयंत पाटील यांना तीन बहिणी आहेत.
बारामती, राहुरी आणि नगरला जयंत पाटील यांच्या बहिणी राहतात.
“भाऊबीजेला दरवर्षी बहिणींकडे जाणं ही वडिलांनी घालून दिलेली परंपरा”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
“भाऊबीजमुळे भेटीगाठी होतात. भेटीत गप्पा होतात. पण त्या घरगुती गप्पा असतात, राजकीय गप्पा नसतात”, असं देखील जयंत पाटील यांनी सांगितलं.
जयंत पाटील यांनी ट्विटरवर भाऊबीज साजरी केल्याचे फोटो शेअर केले आहेत
“मुंबई-ढाकळे-नगर – राहुरी असा जवळपास 525 किलोमीटरचा प्रवास करून भाऊबीज साजरी केली. बहिणींचा आशीर्वाद घेतला. आता कामानिमित्त नाशिकला पोहोचलो. उद्या दिवसभर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. राज्यातील सर्व भगिनींचा संसार सुखाचा होवो. भाऊबीजेच्या पुनःश्च शुभेच्छा”, असं जयंत पाटील ट्विटरवर म्हणाले आहेत.