Jobs : नगरकरांनो ‘ही’ संधी सोडू नका ! वेगवेगळ्या पदांसाठी भरती, 24 रिक्त पदं, शेवटची तारीख 26 एप्रिल
अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेत 24 रिक्त पदांची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसा सोयीस्कर असेल तसा करता येणार आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.
अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahemadnagar) स्नेहालय संस्थेत 24 रिक्त पदांची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसा सोयीस्कर असेल तसा करता येणार आहे. अर्ज (Application) करायची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२२ आहे. वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत असल्यामुळे पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. ती खाली दिलेली आहे. पुरुष आणि महिला वर्ग या पदांसाठी अर्ज करू शकतात. नोकरीचं ठिकाण अहमदनगर आहे. ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याचा स्पष्ट उल्लेख अर्जात किंवा इमेलमध्ये करायचा आहे. खाली संपर्कासाठी मोबाईल नंबर (Mobile Number) दिलेले आहेत. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर फोन करा.
पदाचे नाव आणि उपलब्ध जागा
24 रिक्त पदं
- एच.आर. मॅनेजर – 2 (स्त्री/ पुरुष)
- वाहन चालक – 3 (पुरुष)
- स्टोअर सहाय्यक – 1 ( स्त्री/ पुरुष)
- पर्चेस प्रमुख – 1 (स्त्री/ पुरुष)
- पर्चेस सहाय्यक – 1 ( स्त्री/ पुरुष)
- माळी – 1 पुरुष
- बांधकाम पर्यवेक्षक – 1 पुरुष
- दुरुस्ती सहाय्यक – 2 पुरुष
- वेअर हाऊस व्यवस्थापक – 2 ( 1 पुरुष/ 1 स्त्री )
- सेवा सुविधा विभाग सहाय्यक – 1 ( स्त्री/ पुरुष)
- स्वछता पर्यवेक्षक – 1 पुरुष
- अकाऊंटन्ट – 1 ( स्त्री/ पुरुष)
- मेडिकल ऑफिसर – 1 ( स्त्री/ पुरुष)
- हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर – 1 ( स्त्री/ पुरुष)
- नर्स – 1 स्त्री
- फार्मासिस्ट – 1 ( स्त्री/ पुरुष)
- जनसंपर्क अधिकारी – 2 ( स्त्री/ पुरुष) (हॉस्पिटल)
- लॅब टेक्निशयन – 1 ( स्त्री/ पुरुष)
शिक्षण
- एच.आर. मॅनेजर – एम.बी.ए / एम.एस.डब्ल्यू / एच.आर.मॅनेजमेंटमधील पदविका, अनुभव असल्यास प्राधान्य
- वाहन चालक – जड वाहन चालवण्याचा परवाना, स्कूल बस चालवण्याचा बॅच अनुभव असल्यास प्राधान्य
- स्टोअर सहाय्यक – कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
- पर्चेस प्रमुख – कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक,अनुभव असल्यास प्राधान्य
- पर्चेस सहाय्यक – कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक,अनुभव असल्यास प्राधान्य
- माळी – माळी कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव
- बांधकाम पर्यवेक्षक – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका / कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आय.टी.आय संगणकाचे ज्ञान आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
- दुरुस्ती सहाय्यक – 10वी 12वी पास आणि दुरुस्ती कामांचा अनुभव
- वेअर हाऊस व्यवस्थापक – कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक,अनुभव असल्यास प्राधान्य
- सेवा सुविधा विभाग सहाय्यक – कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक,अनुभव असल्यास प्राधान्य
- स्वछता पर्यवेक्षक – किमान 12वी उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्राधान्य
- अकाऊंटन्ट – बी.कॉम/ एम.कॉम .,टॅलीचे ज्ञान आवश्यक, किमान ३ वर्षांचा अनुभव
- मेडिकल ऑफिसर – एमबीबीएस / बीएएमएस
- हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर – कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक,अनुभव असल्यास प्राधान्य
- नर्स – एएनएम / जीएनएन, अनुभवास प्राधान्य
- फार्मासिस्ट – बी.फार्म / डी.फार्म
- जनसंपर्क अधिकारी (हॉस्पिटल) – कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक, मार्केटिंग क्षेत्रात किमान 2 वर्षे अनुभव
- लॅब टेक्निशयन – डी.एम.एल.टी आणि हॉस्पिटलमधील कामाचा किमान २ वर्षे अनुभव
महत्त्वाचे
नोकरीचं ठिकाण – अहमदनगर
शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022
अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन
इमेल आयडी –
अर्जाचा पत्ता – स्नेहालय, सर्व्हे नं २३९, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, एमआयडीसी, अहमदनगर
संपर्क – 9011052788 / 9226578845
इतर बातम्या :