25 हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची आयुक्तांसोबत दिवाळी
कल्याण-डोंबिवलीतील 25 हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि अधिकाऱ्यांसोबत महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दिवाळी साजरी केली (KDMC commissioner celebrate Diwali with covid warrior).
ठाणे : कल्याण-डोंबिवलीतील 25 हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि अधिकाऱ्यांसोबत महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी आयुक्तांनी या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करुन त्यांना भेटवस्तू दिल्या (KDMC commissioner celebrate Diwali with covid warrior).
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झाला तेव्हा केडीएमसीकडे या आजाराचा सामना करण्यासाठी पुरेशी आरोग्य यंत्रणा नव्हती. केडीएससी आयुक्तांनी आरोग्य यंत्रणा उभी केली. आयुक्तांच्या मदतीला काही खाजगी डॉक्टर पुढे आले. कल्याण भिवंडी रोडवर असलेल्या एमएमआरडीए कोविड सेंटर मध्ये रुग्णावर उपचार सुरु झाले.
या ठिकाणी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी ठेवले जात आहे. एक दिवस असा होता की, याठिकाणी एकाच वेळी तीन हजार रुग्णांवर उपचार, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात होती. आतापर्यंत या कोव्हिड सेंटरमध्ये 25 हजार रुग्णांवर उपचार झाला आहे. या सेंटरच्या कार्यप्रणाली विषयी बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. पण त्याचा डॉक्टर्स, नर्स आणि अधिकारी यांच्यावर काही एक परिमाण झाला नाही. ते आपले काम करीत राहिले.
या कोव्हिड सेंटरमध्ये सध्या रुग्णांची संख्या फार कमी आहे. मात्र भविष्यात रुग्ण वाढले तरी या ठिकाणी उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आज धनतेरसच्या दिवशी एमएमआरडीए कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी केडीएमसी मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील या देखील उपस्थित होत्या. त्याठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांच्या कार्याचा सन्मान केला, त्यांना भेटवस्तू दिल्या (KDMC commissioner celebrate Diwali with covid warrior).
हेही वाचा :
मी डॉक्टर नसलो तरी इंजेक्शन देतो, इंजेक्शन देता आलं पाहिजे, पण तुम्ही देऊ नका : मुख्यमंत्री