केडीएमसी महापौरांची नर्स म्हणून काम करण्याची इच्छा, आयुक्तांकडे पत्रामार्फत मागणी
केडीएमसीच्या महापौर विनिता राणे (KDMC Mayor Vinita Rane) यांना पुन्हा रुग्णांची सेवा करायची आहे. विनिता राणे यांनी नगरसेविका होण्याआधी शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून काम केलं आहे.
ठाणे : कल्याण-डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (KDMC Mayor Vinita Rane) वाढत चालली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांना पुन्हा रुग्णांची सेवा करायची आहे. विनिता राणे यांनी नगरसेविका होण्याआधी शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून काम केलं आहे. मुंबई महापालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयात त्यांनी 32 वर्ष परिचारिका म्हणून काम केलं आहे (KDMC Mayor Vinita Rane) .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर महापौर विनिता राणे यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यांनी याबाबत तसे पत्र केडीएमसीचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांना पाठवून कायदेशीर अनुमती मागितली आहे. मात्र महापौर गेल्या महिन्यात 19 मार्च रोजी डोंबिवलीत पार पडलेल्या लग्न समारंभात उपस्थित होत्या. या लग्नात एक कोरोनाबाधित रुग्णही उपस्थित होता. त्यामुळे त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि आजच त्यांचा क्वारंटाईनचा अवधी संपला आहे.
कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या 43 वर
कल्याण-डोंबिवलीत आज पुन्हा 5 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही भाजीपालासाठी मार्केटमध्ये गर्दी सुरुच आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीत जंतुनाशक आणि पाण्याची फवारणी सुरु आहे. कल्याण डोंबिवलीतील नगरसेवक नवीन गवळी, कुणाल पाटील, महेश गायकवाड, मल्लेश शेट्टी, मनोज राय यांच्याकडून गरजू नागरिकांना दररोज धान्य आणि जेवण वाटप सुरु आहे. काही ठिकाणी ड्रोनद्वारे पोलिसांची नागरिकांवर नजर आहे.
संबंधित बातम्या :
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर, 24 तासात 549 नवे रुग्ण
पुणेकरांना गांभीर्य आहे की नाही? लॉकडाऊन मोडण्यात अव्वल, सर्वाधिक गुन्हे पुण्यात!