बस आणि टेम्पोचा टोल माफ, जाहिरातीतही सवलत, सरकारकडून जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या मागण्या मान्य

"जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने आपल्या प्रस्तावामध्ये मागणी केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याचबरोबर बाकीच्याही मागण्या मान्यतेच्या मार्गावर आहेत", असं अमेय खोपकर यांनी सांगितलं (Maharashtra government accepted demands of Marathi Theatre Producers Association).

बस आणि टेम्पोचा टोल माफ, जाहिरातीतही सवलत, सरकारकडून जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या मागण्या मान्य
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 12:24 AM

मुंबई : जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमये खोपकर यांच्यासह अभिनेते प्रशांत दामले, चंदू लोकरे, दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर, वैजयंती आपटे यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कोरोना संकटात नाट्यसृष्टीला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन दरम्यान जवळपास आठ महिन्यांपासून नाट्यगृह बंद आहेत. त्यामुळे कलाकार आणि नाटक निर्माते यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली (Maharashtra government accepted demands of Marathi Theatre Producers Association).

जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे लॉकडाऊननंतर नाट्यगृह सुरु करण्यात येणाऱ्या अडचणी सांगितल्या. याबाबत त्यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या मागितल्या. त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे.

“जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने आपल्या प्रस्तावामध्ये मागणी केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याचबरोबर बाकीच्याही मागण्या मान्यतेच्या मार्गावर आहेत”, असं अमेय खोपकर यांनी सांगितलं (Maharashtra government accepted demands of Marathi Theatre Producers Association).

सरकारकडून कोणत्या मागण्या मान्य?

1) बस आणि टेम्पोचा टोल माफ 2) सकाळ वृत्तपत्राच्या जाहिराती दरात 35 टक्के सवलत, तसेच इतर पेपरच्या दरात ही सवलत मिळेल, असं खोपकर यांनी सांगितलं. 3) नाट्यगृहांची स्वच्छता : बालगंधर्व, कोथरूड यैथे काम सूरु, तर मुंबईतील वाशी, बोरीवली, गडकरी, घाणेकर यांची स्वच्छता झाली असून नाट्यगृह प्रयोगासाठी तयार असल्याची माहिती अमेय खोपकर यांनी दिली. 4) नाट्यगृहच्या भाड्यात माफी मिळावी, ही मागणी संघाने जोर लाऊन धरली आहे. त्यावर सकारात्मक निर्णय पुढील आठवड्यात मार्गी लागेल, असं खोपकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ‘लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाड थेट ‘वर्षा’वर!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.