सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत ‘कसरती’ सुरु; अखेर जिम उघडल्या!

जिमचा दसऱ्याच्या दिवशी पुन्हा एकदा श्रीगणेशा झाला. अनेक दिवसांपासून बंद असलेले जिम आता पुन्हा एकदा जिम मालक टप्प्याटप्प्याने सुरु करत आहेत.

सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत 'कसरती' सुरु; अखेर जिम उघडल्या!
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 12:54 PM

मुंबई: राज्यात कोलमडलेला जिम उद्योग पुन्हा सुरु करण्यासाठी वारंवार मागणी केल्यानंतर (Maharashtra Government Permits Gyms In Maharashtra) अखेर राज्य सरकारने राज्यात जिम सुरु करण्यास परवानगी दिली. त्यापार्श्वभूमीवर आज राज्यातील जिम सुरु करण्यात आले आहेत  (Maharashtra Government Permits Gyms In Maharashtra).

जिमचा दसऱ्याच्या दिवशी पुन्हा एकदा श्रीगणेशा झाला. अनेक दिवसांपासून बंद असलेले जिम आता पुन्हा एकदा जिम मालक टप्प्याटप्प्याने सुरु करत आहेत. आज जिममध्ये पूजा करुन जिमचा श्रीगणेशा करण्यात आला.

सरकारचे नियम पाळून जिम आजपासून सुरु राहणार आहेत. मग या नियमांमध्ये वापर ठराविक अंतर, मास्क वापरणे, जिममध्ये येणार्‍यांची ठराविक संख्या त्यांना गटागटाने बोललावं, जिमच्या मशीन वारंवार निर्जंतुकीकरण करणे, असे विविध नियम देण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने मोठ्या प्रमाणात जिम व्यावसायिकांचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी काही महिने तरी लागणार आहेत. परंतु, सरकारने रेशीम उघडण्यास परवानगी दिली. याबद्दल जिम व्यवसायिक सरकारचे आभार मानत आहेत.

राज्य सरकारने परिपत्रक जारी करुन हा निर्णय जारी केला. एसओपी (मार्गदर्शक सूचना) पालन करुनच हे जिम सुरु करता येणार आहे. मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये जिम सुरु करता येणार नसल्याचं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. जिम सुरु केल्यानंतर जिम चालकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं असल्याचंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

राज्यातील जिम सुरु व्हाव्यात म्हणून गेल्या काही महिन्यांपासून मागणी होत होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वात आधी जिम सुरु करण्याची मागणी केली होती. त्यांना काही जिम चालकांनी भेटून तसे निवेदनही दिले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटूनही जिम चालकांनी जिम सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला राज यांनी पाठिंबाही दिला होता. एवढेच नव्हे तर या जिम चालकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनाही जिम सुरू करण्याची गळ घालण्यात आली होती. यावेळी जिम चालकांनी त्यांना होत असलेल्या नुकसानीची आणि पर्यायी उत्पन्नाचं साधन नसल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांना दिली होती. तर, मुख्यमंत्र्यांनीही एसओपी सादर करावी, त्यानंतर जिम सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असं आश्वासन जिम चालकांना दिलं होतं. त्यानंतर आज अखेर जिम सुरू करण्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील जिम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Government Permits Gyms In Maharashtra)

संबंधित बातम्या: 

दसऱ्यापासून राज्यभरात जिम, व्यायामशाळा सुरू होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिमच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार

आधी जिम-थिएटर, आता ‘या’ व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.