नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारला मोठं यश, ज्या मुद्द्यावर विरोधकांनी घेरलं त्यातच मिळवला विजय

बेरोजगारीचे प्रमाण वाढवण्यासाठी विरोधकांकडून मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू होता.

नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारला मोठं यश, ज्या मुद्द्यावर विरोधकांनी घेरलं त्यातच मिळवला विजय
बिहारमधील यशाचं भाजप कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन केलं जात आहे. यासाठी विजय रॅली काढण्यात आली.
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 7:56 PM

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी सरकारला मोठं यश आलं आहे. भारतात बेरोजगारी दर (Unemployment rate) वाढत असल्यामुळे वारंवार मोदी सरकारवर (Modi government) टीका केली जात होती. इतकंच नाही तर बेरोजगारीचे प्रमाण वाढवण्यासाठी विरोधकांकडून मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू होता. पण या सगळ्यात नुकत्याच समोर आलेली आकडेवारीनुसार ही सरकारच्या बाजूने आहे. भारतात बेरोजगारीचे प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनादरम्यान, भारतात जूनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 10.18 टक्के होते, ते आता नोव्हेंबरमध्ये 6.51 टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. याआधी सप्टेंबर 2018 मध्ये बेरोजगारीचा आकडा 6.47 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) ने आकडेवारी जाहीर केली आहे. (modi government achievements india unemployment rate plummeted in november for the first time since september 2018)

कोरोना जीवघेण्या महामारीमुळे एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 23.52 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2020 मध्ये तर ही आकडेवारी सर्वाधिक होती. यानंतर कृषी क्षेत्रात झालेल्या सुधारणेमुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात बेरोजगारीचं प्रमाण कमी होऊ लागल्याचं दिसून आलं.

भारतात ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 6.98 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 6.67 टक्के होता. देशातील ग्रामीण बेरोजगारीच्या दराविषयी सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये हा दर 6.90 टक्के होता तर नोव्हेंबरमध्ये 6.26 टक्क्यांवर घसरला.

आता देशभरातील आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर नोव्हेंबरमध्ये हरियाणात बेरोजगारीचं प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 25.6 टक्के होतं. यानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथं बेरोजगारीचा दर 18.6 टक्के आहे. यानंतर गोवा 15.9 %, त्यानंतर हिमाचल प्रदेश 13.8 %, त्रिपुरा 13.1 %, पश्चिम बंगाल 11.2 % आणि बिहार बेरोजगारी दर 10% आहे.

इतर बातम्या – 

मोदी सरकारला मोठा दिलासा, नोव्हेंबरमध्ये तब्बल 1 लाख कोटींहून अधिक GST जमा

‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

(modi government achievements india unemployment rate plummeted in november for the first time since September 2018)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.