मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई दररोज रेल्वे, कन्फर्म तिकीट हाच पास, टीसीकडून तिकीट मिळणार नाही

रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे वाहतूक सुरु करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे (Mumbai-Delhi and Delhi-Mumbai trains). देशात उद्यापासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे वाहतूक सुरु होत आहे.

मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई दररोज रेल्वे, कन्फर्म तिकीट हाच पास, टीसीकडून तिकीट मिळणार नाही
कोव्हिड - 19 जीवघेण्या (COVID-19 Pandemic) संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन कारावा लागला. या काळात अनेक लहान-मोठे उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले. याच लघू उद्योगांना पुन्हा चालना देण्यासाठी सरकारने महत्त्वाची पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Follow us
| Updated on: May 11, 2020 | 7:05 PM

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे वाहतूक सुरु करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे (Mumbai-Delhi and Delhi-Mumbai trains). देशात उद्यापासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे वाहतूक सुरु होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून उद्यापासून (12 मे) मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई अशी दररोज दोन्ही बाजूने एक रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक नागरिक विविध राज्यात अडकले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे (Mumbai-Delhi and Delhi-Mumbai trains).

प्रवाशांना या रेल्वेसाठी सात दिवस अगोदर ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे. या गाड्यांसाठी कन्फर्म तिकीट हाच ई-पास असेल, वेगळ्या पासची गरज नाही. या ट्रेनसाठी टीसीकडून तिकीट मिळणार नाही. त्याचबरोबर प्रवाशांना स्क्रिनिंगसाठी 90 मिनिटे आधी रेल्वे स्थानकांवर पोहोचावं लागेल. रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

याशिवाय उद्यापासून सुरु होणाऱ्या रेल्वे वाहतूकीसाठी कुठल्याही कर्फ्यू पासची आवश्यकता नाही. जर तुमचं तिकीट वेबसाईटवर कन्फर्म असेल तर तेच ई-तिकीट म्हणजेच तुमचा ई-पास मानला जाईल. त्याआधारे तुम्ही स्टेशनवर जाऊ शकता किंवा स्टेशनवर उतरल्यावर पुढचा प्रवास करु शकता, अशी माहिती रेल्वे प्रशानाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, उद्यापासून सुरु होणाऱ्या मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई या रेल्वे गाड्यांचा सुरत, बडोदा, रतलाम आणि कोटा या रेल्वे स्थानकांवर थांबा असणार आहे. त्यामुळे सुरत, बडोदा, रतलाम आणि कोटा शहरांमध्ये जाण्यास इच्छूक असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक जाहीर :

  • 30 रेल्वेगाड्या उद्यापासून सुरु होणार
  • 02951 मुंबई सेंट्रल ते दिल्ली संध्या. 5.30 ला निघणार
  • 02952 दिल्ली ते मुंबई सेंट्रेल संध्या 4.55 ला निघणार
  • 02413 मडगाव ते दिल्ली स. 10.30 वा. निघणार
  • 02414 दिल्ली ते मडगाव स.11.25 ला निघणार

दिल्लीहून 15 शहरांच्या दिशेला रेल्वे गाड्या रवाना होणार

रेल्वे विभाग 12 मेपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वेगाड्या सुरु करणार आहे. सुरुवातीला 12 मे रोजी देशभरातील 15 रेल्वे स्टेशनदरम्यान 15 गाड्या (30 फेऱ्या) सुरु होतील. या रेल्वे गाड्यांसाठी 11 मे रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग सुरु करण्यात आली आहे. रेल्वेच्या (irctc) अधिकृत वेबसाईटवर आणि अॅपवर यासाठी तिकीट बूक करता येणार आहे. यामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

12 मे रोजी सुरु होणाऱ्या रेल्वे गाड्या विशेष रेल्वे म्हणून सुरु होतील. या विशेष रेल्वे नवी दिल्ली (दिबरुगड), आगरताळा, हावरा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवी या 15 रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवासी वाहतूक करतील. त्यामुळे देशभरात अडकून पडलेल्या प्रवाशांना या ठिकाणांहून आपल्या गावाच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि तिकीट बुकिंग, रेल्वे प्रवाशांसाठी गृह मंत्रालयाची नियमावली जारी

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.