AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत चार महिन्यांनी मॉल सुरु, एका दिवसात बंद

राज्य सरकारने राज्यातील सर्व मॉल 5 ऑगस्टपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे (Navi Mumbai Municipal commissioner order to close Shopping Malls).

नवी मुंबईत चार महिन्यांनी मॉल सुरु, एका दिवसात बंद
| Updated on: Aug 06, 2020 | 9:11 PM
Share

नवी मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सर्व मॉल 5 ऑगस्टपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी सरकारकडून नियमावलीदेखील जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या परवानगीनुसार राज्यासह नवी मुंबईतही कालपासून (5 ऑगस्ट) मॉल सुरु झाले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 5 ऑगस्टपासून सुरु झालेले मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत (Navi Mumbai Municipal commissioner order to close Shopping Malls).

महापालिका आयुक्तांच्या आदेशामुळे काल सुरु झालेले मॉल आजपासून पुन्हा बंद झाले आहेत. कोरोनामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले आहे (Navi Mumbai Municipal commissioner order to close Shopping Malls).

नवी मुंबई शहरात कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि सिवूडस भागातील मॉल पुन्हा खुले करण्यात आले होते. ग्राहकांनी मॉलमध्ये यावं यासाठी काही आकर्षक भेटवस्तूदेखील ग्राहकांना दिल्या गेल्या. सिवूडस येथील एका मॉलमध्ये तर पहिल्याच दिवशी तब्बल साडेतीन हजार ग्राहकांनी भेट दिली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पहिल्याच दिवशी एवढ्या संख्येने ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यामुळे मॉल व्यवस्थापकदेखील भारावून गेले. मॉलमधील 60 टक्के दुकाने सुरु असली तरी कोरोनाकाळात मिळालेला प्रतिसाद पाहता मॉल व्यवस्थापकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, महापालिकेने आज पुन्हा मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी मुंबईत अद्यापही कोरोना नियंत्रणात आलेला नाही. शहरातील प्रत्येक नोडमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. यापैकी एखादा रुग्ण मॉलमध्ये गेल्यास पुन्हा कोरोनाचा स्फोट होऊ शकतो. सध्या नियंत्रणात असलेली परिस्थितीत हाताबाहेर जाऊ शकते, या भीतीमुळे अभिजीत बांगर यांनी पुन्हा मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशमुळे 5 ऑगस्टपासून सुरु झालेले मॉल बंद करण्यात आले. महापालिकेच्या निर्णयामुळे नवी मुंबईतील ग्राहकांना मॉल सुरु झाल्याचा आनंद एक दिवसाचा ठरला आहे.

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.