Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

P L Deshpande Birth Anniversary | नट, नाटककार, अन् कथाकार पु. ल. देशपांडे, असा लेखक ज्याने कित्येक पिढ्यांना खळखळून हसवलं

लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशी ओळख असलेले पु.ल. देशपांडे हे त्यापैकीच एक. त्यांनी साहित्य आणि कला क्षेत्रात केलेले काम आजही ताजे असून त्यांच्या या कामाची दखल घेतल्याशिवाय मराठी साहित्याचं महात्म्य सांगितलंच जाऊ शकत नाही. आज पुल देशपांडे यांची जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यावर थोडा प्रकाश टाकुयात.

P L Deshpande Birth Anniversary | नट, नाटककार, अन् कथाकार पु. ल. देशपांडे, असा लेखक ज्याने कित्येक पिढ्यांना खळखळून हसवलं
P L DESHPANDE
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 8:47 AM

मुंबई : आपल्या भोवताली अशा काही व्यक्ती होऊन जातात ज्यांच्या कर्तृत्वाचा ठसा पुढच्या कैक पिढ्यांवर उमटतो. त्यांनी केलेले काम, त्यांचा स्वभाव या गोष्टींची कित्येक वर्षे चर्चा केली जाते. महाराष्ट्रात तर अशा व्यक्तींची कमतरता नाहीये. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशी ओळख असलेले पु.ल. देशपांडे हे त्यापैकीच एक. त्यांनी साहित्य आणि कला क्षेत्रात केलेले काम आजही ताजे असून त्यांच्या या कामाची दखल घेतल्याशिवाय मराठी साहित्याचं महात्म्य सांगितलंच जाऊ शकत नाही. आज पुल देशपांडे यांची जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यावर थोडा प्रकाश टाकुयात.

अभिनेता, दिग्दर्शक, कथालेख, संवादलेखक पु.ल. देशपांडे 

पु.ल. देशपांडे एक विनोदी लेखक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. तसेच नाटककार, पटकथाकार, संगीतकार, नट, दिग्दर्शक अशा कितीतरी बिरुदावल्या त्यांच्या नावासमोर लावल्या जातात. पु.ल. देशपांडे यांनी 1943 पासून लिखानास सुरुवात केली. सुरुवातीला ते अभिरुची या मासिकातून लिखाण करायचे. पुढे अन्य नियतकालिकांमधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होऊ लागले. त्यांना नाटकाचीही आवड होती. नाट्यक्षेत्रातील यशामुळे देशपांडे यांना पुढे चित्रपटातदेखील काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी पुढचे पाऊल या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती. गुळाचा गणपती या चित्रपटाची त्यांनी कथा लिहिली. एवढेच नव्हे तर त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक, संवादलेखक म्हणून भूमिका पार पाडली होती.

अनेक नाटकं लोकप्रिय ठरली

पु.ल. देशपांडे यांनी त्यांच्या हयातीत अनेक अजरामर नाटकं लिहिली. काही इंग्रजी नाटकांचे त्यांनी मराठीत रुपांतर केले. 1948 साली त्यांनी तुका म्हणे आता हे पहिले नाटक लिहिले. हे नाटक सपेशल अयशस्वी ठरले. नंतर 1952 साली लिहलेले अंमलदार हे त्यांचे नाटक चांगलेच लोकप्रिय ठरले. त्यांचे तुझे आहे तुजपाशी, भाग्यवान (1953), सुंदर मी होणार (1958) आदी नाटकं चांगलेच लोकप्रिय ठरले.

व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार

देशपांडे यांनी अनके व्यक्तिचित्रे लिहिली. यामध्ये त्यांनी 1962 साली लिहलेल्या व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाची आजची तेवढीच स्तुती केली जाते. साहित्यरसिक आजही हे पुस्तक तेवढ्याच आवडीने वाचतात. 1965 मध्ये या पुस्ताकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला होता. पुढे त्यांनी विनोदी लेखनाकडे आपला मोर्चा वळविला, खोगीरभरती (1946), नस्ती उठाठेव (1952), बटाट्याची चाळ (1958), गोळाबेरीज (1950), असा मी असामी (1964) आणि हसवणूक(1968) ही काही त्यांची विनोदी लेखसंग्रहं आहेत.

पु.ल. देशपांडेंना पद्मश्री, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष

पु.ल. देशपांडे यांनी काही प्रवासर्णनेदेखील लिहलेली आहेत .अपूर्वाई (1960), पूर्वरंग (1960), जावे त्यांच्या देशा (1974) ही त्यांच्या प्रवासवर्णनांची काही उदाहरणे. पु.ल. देशपांडे यांची ही ग्रंथसंपदा वाचून महाराष्ट्रात कैक पिढ्या घडल्या. कैक वाचकांच्या चेहऱ्यावर पु.ल. यांनी हसू फुलवलेले आहे. मराठीचा इतिहास त्यांच्यावाचून पूर्ण होऊच शकत नाही. पुढे त्यांना 1966 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1967 सालच्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे नाट्यसंमेलन नांदेड येथे भरले होते. अशा या महान हरहुन्नरी आणि बहुआयामी व्यक्तीमत्त्वाला सलाम.

इतर बातम्या :

T20 World Cup 2021: न्यूझीलंडकडून अफगाणिस्तानचा पराभव, भारत स्पर्धेबाहेर, किवीजची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

कुत्री मरते तरी दिल्लीचे नेते शोक करतात, राज्यपाल मलिक यांच्या टार्गेटवर पुन्हा मोदी सरकार

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या पालखी मार्गांचे भूमिपूजन, कसा असेल सोहळा?

(p l deshpande birth anniversary know about p l deshpande his book awards and career)

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.