वर्दीतील योद्ध्यांच्या हाती फावडे आणि घमेलं पाटी, खड्डे भरुन वाहतूक कोंडी फोडली
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वसईत पोलिसांनी हातात फावडे आणि घमेलं घेऊन खड्डे बुजविले (Police filled the potholes on the highway).
पालघर : कोरोनाविरोधाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. या लढाईत अनेक पोलिसांनादेखील कोरोनाची लागण झाली. मात्र, अशा परिस्थितीतही पोलीस धैऱ्याने लढत आहेत. विशेष म्हणजे वसईत तर महामार्ग पोलिसांनी आज (10 ऑगस्ट) स्वत: खड्डे बुजविले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वसईत पोलिसांनी हातात फावडे आणि घमेलं घेऊन खड्डे बुजविले (Police filled the potholes on the highway).
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत मालजीपाडा येथे ओहरब्रिजचे काम सुरु आहे. त्यामुळे तीन लेनची वाहतूक ही एका लेनवरुन सुरु आहे. ज्या लेनवर वाहतूक सुरु आहे त्यालेनवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबई आणि मुंबईहून गुजरात अशा दोन्ही मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यातच रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
याबाबत महामार्ग पोलिसांनी आयआरबीकडे बऱ्याचवेळा तक्रार केली होती. मात्र, तरीदेखील आयआरबीकडून रस्त्याची डागडुजी झाली नाही. खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि महामार्ग वाहतूक पोलिसांवर याचा प्रचंड ताण पडत होता. त्यामुळे पोलिसांनी स्वत: पुढाकार घेत खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला (Police filled the potholes on the highway).
महामार्गावर आज सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही वाहतूक कोंडी काढण्यासाठी चिंचोटी महामार्ग केंद्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वडे यांच्या पुढाकारातून पोलीस नाईक शिवराज झांजुरने, अविनाश पानसरे,बाळासाहेब वने, बंडू पाटील, पोलीस हवालदार सुनील भालेराव या वर्दीतल्या पोलिसांनीच हातात फावडे आणि घमेलं घेऊन महामार्गावरील खड्डे बुजविले. या उपक्रमातून पोलिसांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक सुरळीत केली.